Shravan Month 2023 : सणांचा राजा श्रावण महिना..! व्रतवैकल्यांना आजपासून सुरुवात, महिलांसह भाविकांसाठी पर्वणी

निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे.
Shravan Month 2023
Shravan Month 2023Sakal
Updated on

Shravan Month 2023 , नांदेड - सण, व्रतवैकल्यांनी नटलेला श्रावण मास प्रत्येकाला हवाहवासा असतो. क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन असे रूप घेऊन येणाऱ्या या पवित्र महिन्यात निसर्गही हिरवाईने नटतो. गुरुवारपासून (ता.१७) श्रावणमास सुरू होत असून महिलांसह भाविकांसाठी पर्वणी असेल.

दरम्यान, मराठवाड्यात सर्वदूर पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. निसर्ग खुलण्यासाठी, शेती बहरण्यासाठी आणि सर्व जलाशय ओतप्रोत होण्यासाठी या महिन्यात वरुणराजाला साकडे घातले जाईलच.

Shravan Month 2023
Nanded : सर्वाच्या प्रयत्नातून व सहकार्यातून बालविवाह निर्मूलनासाठी गावोगावी लोकचळवळ ;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात होते. निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन-पावसाचा खेळ श्रावणामध्येच सुरू होतो.

Shravan Month 2023
Sambhaji Nagar : पावसाअभावी वाळलं अन् ‘लष्कर’ने संपवलं

श्रावण महिना हा उत्सवांचा म्हणून ओळखला जातो. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहांसाठी माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते.श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते ते अत्यंत निर्मळ वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना. महादेवाला प्रिय असणाऱ्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावस्येपर्यंतच्या येणाऱ्या विविध सण, व्रतांमुळे या महिन्यला सणांचा राजा म्हटले जाते.

श्रावण महिन्याचे महत्त्व

भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे. या महिन्यातील व्रतांमुळे वातावरण पवित्र होते. या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते अशी समाजमान्यता आहे. महादेवाची विधिवत पूजाअर्चा केल्याने इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोष असतो.

श्रावणी सोमवार

सणाची सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामुठीने. दर श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे व्रत पहिली पाच वर्षे तर अनेक महिला नित्य हे व्रत करतात.

मंगळागौर पूजन

नवविवाहितेला सासर आणि माहेर अशा दोन्हीकडील प्रेम मिळते. श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत केले जाते. मंगळागौरीची पूजा, ओव्या, उखाणे, फुगडी, ओटी भरणे, रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते.

Shravan Month 2023
Nanded : मूर्तिजापुरातील अवैध कत्तलखाना उद्‍ध्वस्त; १९० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक

नागपंचमी

बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची यादिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा होते. यादिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही. वारुळाचीही पूजा करण्याचीही पद्धत आहे.

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन

हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात. कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो. भावाबहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन. सामाजिक ऋणानुबंध जपण्याचा हा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.