Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी

nanded news
nanded news
Updated on

नांदेड : कुठलाही देश, राष्ट्र शाळेतून घडत असतो. गत दोन-तीन महिन्यांपासून आपण कोरोनाच्या दहशतीचा अनुभव घेत आहोत. शाळा बंद, सर्व जीवनव्यवहार बंद पडलेले आहेत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला आहे की, शाळा कधी सुरु होणार? सुरु झाल्यावर स्थिती कशी असेल?

लॉकडाउनमध्ये शिथिलता देवून व्यवहार सुरु झाले असले तरी, जोपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत तोपर्यंत समाजव्यवहार, जीवनाला सुरुवात झाल्यासारखं वाटणार नाही. कारणही तसेच आहे. आपण सर्व व्यवहार सुरु केले तरी, शाळा बंद असतील तर सर्व समाजाला वाटणार की समाज व्यवहार अजूनही बंदच आहेत. शाळा ही समाजाचा आरसा असते. शाळा सुरु झाल्या की, समाज सुरु झाल्यासारखं वाटतं. आजची स्थिती पाहता किमान दोन-तीन महिने तरी शासन शाळा सुरु करण्याचा विचार करणार नाही. शाळा सुरु झाल्याच तर जोपर्यंत पालक, विद्यार्थ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जात नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत येऊच शकणार नाही.

हेही वाचा - मुंबईहून आलेल्या दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शाळा प्रारंभानंतरची परिस्थिती कशी असेल?
कोरोना विषाणुमुळे शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. असेच वातावरण समाजामध्ये, शाळेमध्ये देखील राहणारच आहे. कारण शाळेमध्ये उद्याचं राष्ट्र मोठं होत असतं. शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर उद्याचा देश, राष्ट्र वाढत असतो. त्यामुळे ही अतिशय संवेदनशील बाब आहे. जागा आहे. म्हणूनच विचारलं जात की, शाळा प्रारंभानंतर काय होणार. समाजामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव संपला तरी, किमान एक वर्षभर तरी काळजी घ्यावीच लागणार आहे. पण एक ते तीन महिने शाळा प्रारंभाला वेळ लागला तरी त्यानंतर काय होईल? असा प्रश्न असणारच आहे.

हे देखील वाचाच - ‘या’ माफियांवर आली सक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले ​

अशी घ्यावी लागणार खबरदारी
शाळा सुरु झाल्यावर शारीरिक अंतरासोबतच स्वच्छतेचा प्रश्‍न शाळा क्षेत्रामध्ये प्रश्न भेडसावणार आहे. म्हणून वेगवेगळ्या अॅंगलने विचार सुरु आहे. एक दिवसाआड शाळा केल्या तर सम-विषम दिवशी विद्यार्थ्यांना बोलावता येईल. त्यामुळे फिजिकल डिस्टिन्सिंगनुसार विद्यार्थ्यांना बसविणे शक्य होईल. विद्यार्थ्यांना एक दिवस सुटी मिळेल. त्यांच्या मनावरील ताणही कमी होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशी अभ्यास दिला तर स्वयंअध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागेल. शाळेतील स्वच्छतागृह, हात धुण्याची व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकऱ्यांनी धडे द्यावेच लागणार आहेत. असे केले तर शाळेचे वातावरण सुधारण्यास वेळ लागणार नाही.

 

विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः अभ्यास करून गावकरी, विद्यार्थी, पालकांचे प्रबोधन करायला पाहिजे. शिक्षण आणि शाळा हा राष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक विचारवंताने उद्याची संपन्न, ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न आणि उत्तम पिढ्यांचे निर्मिती करावयाची असेल तर विद्यार्थ्यांना पुन्हा रचनावादाची चांगली ओळख करून द्यायला पाहिजे.
- डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.