Success Story-नांदेड : तळ्याची वाडी येथील गावरान पपईला मोठी मागणी, कष्टाचे चीज- शेतकरी शंकर वाकोडे

file photo
file photo
Updated on

घोगरी (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : पिकलेल्या गावरान पपईच्या बीजाचे संकलन करत, तळ्याची वाडी (ता. हदगाव) येथील एका शेतकऱ्याने जवळपास सव्वाशे गावरान पपई रोपाची शेतीच्या बांधावर लागवड केली आहे. योग्य देखभाल केल्याने या पपईला नुकताच बहर सुरु झाल्याचे चित्र आहे. ऐन हिवाळ्यातच पपई हंगाम सुरु होण्याने, शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं असून, या गावरान पपईला परिसरातून मोठी मागणी वाढल्याने, त्यांना यातून चांगल्या मिळकतीची आशा आहे.

तळ्याची वाडी (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर रामजी वाकोडे हे अल्पभूधारक शेतकरी असूनही, ते इतर पिकाच्या तुलनेत प्रतिवर्षी फळ शेतीला अधिक महत्व देतात. त्यांच्याकडे आज घडीला नामवंत अशी अमराई टिकून असल्याचे पहावयास मिळते. प्रतिवर्षी या परिसरात निसर्गाचा प्रकोप होण्याने, खरीप, रब्बी, हंगामातील पेरलेली पिके, कधी जास्तीच्या पाऊस होण्याने तर कधी अल्प पावसामुळे, वाया जात असल्याने, शेती बिन भरवशाची बनली असल्याने, शेती परवडत नसल्याची बळीराजाची ओरड आहे. यामुळे नैसर्गिक रित्या शेतीत असलेली गावरान अमराईला गावरान पपईची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी गावरान पपईच्या बिया मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता, त्यांना कुठेही गावरान पपई च्या बिया मिळेनात.

आपल्याच शेतीच्या जवळ असणाऱ्या उकिरड्यावर त्यांना एक पपईचे उगवलेले रोपट दिसलं. हे रोप मोठ्या आवडीने त्यांनी घरी आणून त्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. कालांतराने या इवलेशा रोपट्याला फळा, फुलाचा, बहर सुरु झाला. पक्व झालेल्या पपईच्या बीजाची संकलन करुन, सदर शेतकऱ्यांनी जवळपास सव्वाशे लहान रोपटे तयार केली. पावसाळा लागताच त्या लहान रोपट्याची शेतीच्या बांधावर लागवड करण्यात आली. ऐन हिवाळ्यातच या गावरान पपईला बहर सुरु झाला असल्याने, शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झाल्याचे दिसून येत आहे.

बिन भांडवली गावरान पपईला मागणी

या बिन भांडवली गावरान पपईला परिसरातील खवय्याकडून मोठी मागणी वाढल्याने, या गावरान पपई फळ शेतीतून सदर शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख मिळकतीचा अनुमान आहे. पपई ही आरोग्यासाठी लाभकारी, व सहज पचणारे फळ आहे. भूक आणि शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून “कावीळ” सारख्या रोगापासून मुक्ती देणार हे फळ असल्याने, या पपईला तिन्ही ऋतूत चांगली मागणी असल्याचे दिसून येते. शिवाय थेट शेतीच्या बांधावरच्या पपईची विक्री होत असल्याने व अल्प खर्चिक बाब असल्याने ही फळशेती परवडणारी आहे. इतर शेतकऱ्यांनीही या शेतीची अवलोकन करावं असं आवाहन करण्यात आले. 
- शंकर वाकोडे, शेतकरी, तळ्याची वाडी 

भविष्यात या शेतीला अधिकचे प्राधान्य देण्याचा माझा मानस

संकरित "तैवाण " पपई जातीच्या तुलनेत, गावरान पपईला फळाचा बहर कमी येतो. परंतु वाजवी किंमत मिळत असल्याने उत्पन्न दुपटीने मिळत असल्याने व अल्प खर्चिक बाब असल्याने ही शेती करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गावरान पपईच्या खाऊन फेटलेल्या बियाचा संकलन करण्यास सुरुवात केली असून, जवळपास एक हजार बियापासून रोप निर्मिती करुन शेतीत लावगड करुन शेतीला पूरक शेती म्हणून भविष्यात या शेतीला अधिकचे प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे.
- पांडुरंग चोंडे, प्रगतशील शेतकरी ब्रह्म वाडी.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.