नांदेड : प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत लॉकडाउनच्या काळात अल्पवयीन मुलींचे विवाह उरकुन टाकण्याची स्पर्धाच जणू लागली आहे. असाच एक बालविवाह चाईल्ड लाईच्या पुढाकारातून रद्द करण्यात आला. यावेळी मुलीच्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले. यानंतर पालकांनीही होकार देत नियोजीत विवाह सोहळा रद्द केला. हा प्रकार नायगाव तालुक्यातील असल्याचे चाईल्ड लाईनच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. एका पाठोपाठ पाचवे लॉकडाउन लागले असून या काळात प्रशासन आपल्या कामात व्यस्त असल्याचा फायदा अनेक मंडळी घेत आहे. त्यातच लग्न सोहळे पार पडत आहेत. या काळात लग्न तिथी असल्याने अनेकांची लग्न ही मध्यरात्री तर काही भल्या पहाटेच लावून पाहूणे आपल्या गावचा रस्ता धरत आहेत. यात अनेक बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. ही धक्कादायक माहिती मिळताच त्यांनी जिल्ह्यात होणाऱ्या लग्न समारंभावर लक्ष ठेवले होते.
नायगाव तालुक्यातील प्रकार उधळला
नायगाव तालुक्यात असा एक बालविवाह शनिवारी (ता. ३०) होणार होता. ही माहिती चाईल्ड लाईनला मिळताच त्यांनी शासकिय यंत्रणेच्या सह्याने हा बालविवाह रोखला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. काळम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत नायगाव गाठले. बालविवाहाची माहिती नायगाव पोलिसांना दिली. पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी लग्नस्थळ गाठले.
जिल्हा बालविकास व चाईल्ड लाईनचा पुढाकार
नववधूच्या पालकांना बाजूला घेऊन बालविवाह हाकायद्याने गुन्हा असून त्याचे विपरीत परिणाम दोन्ही कुटुंबावर पडतात याची सविस्तर माहिती दिली. यानंतर पालकांनाही त्यांना होकार देत काही तासावर आलेला बालविवाह थांबविला. यावेळी विद्या आळणे यांच्यासमवेत संदीप फुले, चाईल्ड लाईनच्या संगिता कांबळे, आकाश मोरे, केंद्र समन्वयक बालाजी आलेवार, समुपदेशक आशा सूर्यवंशी, निता राजभोज, इंद्रजीत मोरे, अश्विनी गायकवाड, जयश्री दुधाटे आणि स्वयंसेवक एकनाथ पाच्छे यांनी परिश्रम घेतले.
येथे क्लिक करा - लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात
संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचे लक्ष
जिल्ह्यामध्ये कोठेही बालविवाह घडत असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा नांदेड नचाईल्ड लाईन- १०९८ ह्या चोवीस तास बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.