शॉर्टसर्किटमुळे सहा एकरवरील ऊस जळून खाक, आमदार कल्याणकरांची भेट 

file photo
file photo
Updated on

नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या हसापुर येथील तीन शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याची पाहणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केली असून पंचनामे करण्याचे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी दिले.

दीपावलीच्या नंतर साखर कारखाने सुरू होताच ऊस कारखान्याला जाण्यास सुरुवात होती. शेतकऱ्यांचे अर्थकारण पिकावर अवलंबून असते, भारसावडे यांच्या देखील  कन्येचा विवाह दीपावली नंतरच ठेवण्यात आला होता. ऊसातून अधिकचे चार पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र शेतातून गेलेल्या हाय व्होल्टेजच्या ताराचा एकमेकांना स्पर्श होऊन जमिनीवर जाळाचे लोट पडून सहा एकर वरील ऊस जळून खाक झाला आहे. गट नंबर 10/अ/3, 10/अ/1,09 या गटातील जळलेल्या उसाची पाहणी करून सदरील शेतकरी यांना धीर देत मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ. बालाजी कल्याणकर यांनी दिले.

यांची होती उपस्थिती

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी तात्काळ महावितरण, पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाला पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत. पाहणी दरम्यान आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत हसापुर येथील शेतकरी पुंडलिक भारसावडे, मोहनराव भारसावडे, उत्तमराव भारसावडे, तलाठी सचिन पाटील नरवाडे, संतोष हिंगमिरे, शिवसेना तालुका संघटक  नवनाथ काकडे, उपतालुकाप्रमुख संतोष भारसावडे, ग्रामपंचायत सदस्य मारोतराव काकडे, शंकरराव भोसले, देविदास भोसले, पुंडलिक भारसावडे, मोहनराव भारसावडे,  यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.