Nanded Agriculture : नांदेड विभागात २५ पासून गळीत हंगाम,८२ लाख ४८ हजार ७६५ मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज

Nanded Agriculture : नांदेड विभागात २५ ऑक्टोबरपासून उसाच्या गळीत हंगामाला सुरवात होणार आहे. यंदा ८२ लाख ४८ हजार ७६५ मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Sugarcane Price
Sugarcane Pricesakal
Updated on

नांदेड : नांदेड विभागात २५ ऑक्टोबरपासून उसाच्या गळीत हंगामाला सुरवात होणार आहे. सध्या २८ कारखान्यांकडून परवानासाठी ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यांची मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ऊस कमी असल्याने यंदा १५० दिवस गाळप चालणार असून ८२ लाख ४८ हजार ७६५ मेट्रिक टन उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज प्रादेशिक सहसंचालकांनी व्यक्त केला आहे.

नांदेड विभागात नांदेडसह हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. चार जिल्ह्यातील २९ कारखाने येतात. चार जिल्ह्यात गतवर्षी ऊसलागवडीचे क्षेत्र एक लाख ६६ हजार ८५५ हेक्टर होते. तर, यंदा एक लाख २५ हजार ४८५ हेक्टर आहे. यात ४१ हजार ३७० हेक्टरने घट झाली आहे.

त्यामुळे ऊस कमी असल्याने गाळप १५० दिवसच चालेल. तसेच नांदेड जिल्ह्यातील ऊस हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी गाळपासाठी जातो. यावर्षी (२०२४-२५) साधारणतः २.५० लाख मेट्रिक टन ऊस हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप करतील.

तसेच लातूरमधील कारखाने धाराशिव व बीड जिल्ह्यांतील २.८० लाख मेट्रिक गाळप करतील. तसेच परभणी जिल्ह्यातील कारखाने बीड व जालना जिल्ह्यांतील ५.० लाख मेट्रिक ऊस गाळप कर‍तील त्यामुळे विभागातील एकूण गाळप ९०.२८ लाख मेट्रिक टन इतके होईल, असे साखर विभागाकडून सांगण्यात येत आहे.

गतवर्षी परतीचा पाऊस फायद्याचा

गतवर्षी (जून २०२३) मराठवाड्यात नांदेड जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला होता. विशेषतः पाणी कमी झाल्याने उसाचे वजन घटले होते. त्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के उत्पादन घटणार असून साखर उताऱ्यावर आणखी परिणाम होऊन गाळपही कमी होऊन ४० दिवसांत हंगाम गुंडाळला जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, परतीच्या पावसाने चित्र बदलले. १६६ दिवस (१५ एप्रिल रोजी धुराडे बंद) हंगाम चालला असून एक कोटी १७ लाख ६६ हजार ५४५ मेट्रिक टन गाळप झाले होते. त्यामुळे यंदाही आणखी पाऊस सांगण्यात आला आहे. त्यामुळे ऐनवेळी परिस्थ‍िती बदलू शकते, असे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.