सर्पदंश होऊ नये म्हणून ‘ही’ घ्या काळजी

file photo
file photo
Updated on

नांदेड : साप म्हंटले की, भल्या- भल्यांची बोबडी वळते. मात्र सापाला न घाबरता साप दिसताच एकाच ठिकाणी स्तब्द उभे राहावे. सापाच्या दिशेने कुठलीतरी वस्तु फेकावे जेणेकरुन त्याचे लक्ष विचलीत होते. सध्या पावसाळा चालू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते.

पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य मिळविण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.

भारतात अढळणाऱ्या ५२ विषारी सापांच्या जाती

पैकी परिसरात, मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत.

घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी

ँ घराच्या भिंती व कुम्पनाच्या भिंती यांना पडलेली भोके बुजवावेत. यांमध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.
ँ घराजवळ पाला- पाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.
ँ घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
ँ खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
ँ सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवाव्यात.
ँ गवतातुन चालताना पायात बूट असावेत.
ँ अंधारातुन जाताना नेहमी बॅटरी सोबत बाळगावी.
ँ रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपु नये, कारण साप हे निशाचर असतात आणि त्यांचा वावर रात्रीला असतो.
ँ जमिनीवर झोपायाचे असल्यास अंथरण  भिंति लगत न करता मध्य भागी करावे सापांना कोपर्यात अंधरा तुन जाने पसंत आहे.
ँ जर आपण आणि साप समोरा- समोर आलो तर घबरुन न जाता स्तब्ध उभे राहवे.  शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापाच्या बाजूला फेकावी. साप त्या वस्तुकडे आकार्षीत होतो आणि तेवढ्याच वेळात आपण जाऊ शकतो.

साप घरात आल्यास काय कराल

ँ साप घरात आल्यास घाबरु नका, शांत राहा त्याला न मारता आपल्या जवळील जानकार सर्पमित्राला बोलवा.
ँ सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षीत अंतरावरूण सापावर लक्ष ठेवा. लहान मुले, पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवा. जेणे करून त्यांना अपाय होणार नाही. 
ँ सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो. 
ँ नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अश्या सापापासून सावध राहावे. आपल्या परिसरात साप आढल्यास त्याला न मारता वरील खबरदारी घ्यावी व तात्काळ सर्पमित्रला संपर्क करावा असे आवाहन हेल्पिंग हैंड्स वाईल्डलाईफ वेल्फेयर सोसायटी ने केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.