नांदेड : कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी (child and covid) आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. याअनुषंगाने सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या ता. सात मे रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना (Task force) करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (collector dr. vipin) यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सबाबत बैठक घेण्यात आली. (Task Force for the Care and Protection of Orphans in Corona Background)
या बैठकीस पोलिस अधिकारी प्रमोदकुमार शेवाळे, नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे आयुक्त डाॅ. सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांच्यासह आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी अनाथ झालेली मुले आहेत का याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. ही वस्तुस्थिती नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार हे अनाथ बालके असल्यास त्यांची सत्यता पडताळून टास्क फोर्सला माहिती सादर करतील. शुन्य ते सहा वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे सहा ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.