क्रीडा संकुलाचे दुखणे कायम; खेळाडूंच्या भविष्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

खेळांसाठीची मैदाने अजूनही प्रतीक्षेत
sports grounds
sports groundssakal
Updated on

नवीन नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थी-तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमते बरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी. क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, या उद्देशातून शासनाने तालुका तिथे क्रीडा संकुल हे धोरण राबविले होते. या वेळी जिल्ह्याचा व तालुक्याचा क्रीडा विकास होण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. पण आता क्रीडा संकुल परिसरात आजूबाजूला साचणारे पाणी, परिसरात पडलेला कचरा, अपुऱ्या कामामुळे क्रीडा संकुल इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी संकुलाचे मूळ दुखणे मात्र कायम आहे.

sports grounds
मी बोलतो कमी; पण काम अधिक करतो,पालकमंत्री अशोक चव्हाण

क्रीडा स्पर्धांमध्ये विभागीय पातळीपासून देशपातळीपर्यंत यश मिळविणासाठी क्रीडांगणाअभावी गावपातळीवरील मुलांना विविध स्पर्धांना मुकावे लागत होते. हडको, सिडकोसह ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जवळच क्रीडा सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने खेळाडू, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक यांच्यात आनंद व्यक्त केला गेला. क्रीडा संकुल तयार झाले परंतु अल्पावधीतच त्यांची घोर निराशा झाली. तालुका क्रीडा संकुलासाठी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी यांची दोन हेक्टर जागा समितीस देण्यात आली. सदर तालुका क्रीडा संकुल हॉलचे कामही पुर्ण झालेले आहे. दरम्यान क्रीडासंकुलात प्रवेशद्वाराचा पत्ता नाही, या ठिकाणी नव्याने सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. स्वच्छतागृहांची अवस्थाही काही वेगळी नाही. इनडोअर हॉल सुविधा पूर्ण असून येथे खेळांडूकडून प्रत्येकी २०० ते ५०० रुपये शुल्क आकारणी केली जाते. येथे शुल्क देऊन काही खेळाडू खेळायला येतात. क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या बहुतांश खिडक्‍यांच्या काचा फुटल्या असून चेंजिंग रूम, फिल्टरेशन रूम, पब्लिक प्लॅटफॉर्म यासह अन्य सुविधा पुरवणे गरजेचे आहे. परंतु त्याचा दूरवर संबंध दिसत नाही.

sports grounds
औरंगाबाद जिल्हा दूध संघात यंदा १०० टक्के मतदान, कोण मारणार बाजी?

मैदान विकासाच्या प्रतीक्षेत

गेल्या पाच वर्षातील वाटचाल पाहता मूळ संकुलापैकी इनडोअर हॉलचे काम पूर्ण झाले आहे. बाकीचे काम अपूर्ण असून येथील मैदानच पूर्ण नाहीत तर ऊर्वरीत काम पूर्ण कधी होणार यांची क्रीडा प्रेमी वाट पाहत आहेत. यामध्ये २०० मिटरची धावपट्टी, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबाल विविध खेळांची क्रिडांगणे, अंतर्गत रस्ते, प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगणाभोवती संरक्षण भिंत बांधकाम इतर मैदानी खेळांसाठीची मैदाने अजूनही प्रतीक्षेत आहेत.

क्रीडा संकुल तळीरामांचे माहेरघर

रात्री-अपरात्री छुप्या पद्धतीने मद्यपानासाठी तळीराम येथे संधी साधून बसतात. न जाणो भविष्यात एखादी अविचारी घटना घडण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्नही या निमिताने निर्माण होत आहे.

sports grounds
पालघर जिल्हा परिषद आणि पंच्यायत समिती निवडणुकीत 60 टक्के मतदान

मागील पाच वर्षांपासून नियोजित क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वेळोवेळी निवेदने विनंती अर्ज, धरणे आंदोलन अशा विविध माध्यमातून प्रशासनाशी पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापपर्यंत सिडको येथील क्रीडा संकुलाचा विकास झालेला नाही. यात पूर्णपणे जिल्हा क्रीडा कार्यालय जबाबदार आहे. अशी सर्व खेळाडूंची खात्री पटली आहे. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर हे क्रीडा संकुल गोरगरीब कुटुंबातील खेळाडूंच्या सुविधेसाठी निर्माण करून द्यावे तसेच यात असलेल्या प्राथमिक सुविधेत खेळाडूंचे ४०० मीटर रनिंग ट्रॅक, युवकांसाठी जिम व खो-खो, कबड्डी व मल्लखांब इतर खेळाडूंसाठी सोयीयुक्त असलेले हे क्रीडा संकुल लवकरात लवकर खेळाडूंच्या भविष्यासाठी सुरू करावे.

- प्रसेनजीत वाघमारे, कार्यकर्ता.

मागील सात वर्षांपासून तयार झालेले संकुल काही कारणांमुळे अजूनही सामान्य खेळाडू पासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंचा सराव करण्यासाठी पाहिजे तेवढी जागा नसल्या कारणाने तालुका पातळीवरील खेळाडू उंच भरारी घेऊ शेकत नाही. काही दिवसाखाली नांदेड तालुक्यामधील चार खेळाडूंनी अमृतसर येथे झालेल्या तलवारबाजीच्या भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु त्यांना पदकपासून वंचित राहावे लागले. कारण त्यांना योग्य मैदान सरावासाठी भेटले नाही आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणचे त्यांना प्रशिक्षक भेटले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुका क्रीडा संकुलाकडे मुलांना वळवून लवकरात लवकर संकुल चालू करावे आणि संबंधित खेळासाठी प्रशिक्षक नेमावे त्यानंतरच नांदेडचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करून दाखवतील.

- रुपेश कुलथे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.