Nanded News : तामसा येथील ऐतिहासिक गौतमतीर्थाच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता ; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

गौतमतीर्थ बारालिंग मंदिर संबंधित म्हणून ओळखला जातो. येथे वर्षभर भाविक येत असतात. नवरात्रात घटस्थापनेनिमित्त विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन असते.
nanded
nandedsakal
Updated on

तामसा : येथील भाजी-भाकरी पंगतीसाठी प्रसिद्ध असलेल्या बारालिंग मंदिराच्या परिसरात असलेले गौतमतीर्थ (कुंड) पडझडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असून गौतमतीर्थाच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता आहे.

गौतमतीर्थ बारालिंग मंदिर संबंधित म्हणून ओळखला जातो. येथे वर्षभर भाविक येत असतात. नवरात्रात घटस्थापनेनिमित्त विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन असते. सदरील कुंड रामायण काळातील असल्याची आख्यायिका असून श्रीराम सीताहरणानंतर सितेच्या शोधासाठी आयोध्येतून याच मार्गे रावणाच्या लंकेकडे गेले होते. प्रवासादरम्यान श्रीराम गौतमतीर्थ (कुंड) येथे थांबून तहान भागण्यासाठी त्यांनी या ठिकाणी भूगर्भात बाण मारल्याची आख्यायिका आहे. रामायण काळात येथे गौतम ऋषी वास्तव्याला होते, अशी मान्यता आहे. या कुंडाला लागून गौतमी देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असून गौतमतीर्थ मात्र जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.

nanded
Nanded News : नांदेड जिल्ह्यात ३८ हजार ३९० मतदार वाढले

भाजी-भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी येणारा भाविक गौतमतीर्थला जाऊन दर्शन व कुंडातील जल वापरत असत. पण सद्यस्थितीतील कुंडाची अवस्था व त्यातील तळ गाठलेले पाणी हे भाविकांना खटकणारे आहे. तामसाचे प्राचीन व सांस्कृतिक वैभव म्हणून ओळख असलेल्या गौतमतीर्थची अवस्था सध्या दयनीय असून दिवसेगणित वाढणारी उदासीनता चिंताजनक आहे. समाजासोबत शासनाने गौतमतीर्थचा परिसर सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करून या ठिकाणाचे वैभव पुनरुज्जीवीत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. तामसा-भोकर राज्यरस्त्याला लागूनच गौतमतीर्थ हे ठिकाण असून येथे जाण्यासाठी गाडीवाट आहे. शासनाच्या पुरातत्व व सांस्कृतिक विभागाने गौतमतीर्थचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी भाविकातून होत आहे.

पाणीच आटत नाही

या परिसरात तामसाचे ग्रामदैवत असलेल्या मारुतीरायाच्या मूर्तीशी साधर्म्य दाखविणारी मारुतीची उभ्या अवस्थेतील मूर्ती आहे. परिसरात पुजाऱ्यांच्या टुमदार पण मोडकळीस आलेल्या अनेक समाधी असून विविध झाडांनी येथे नैसर्गिक वातावरण अनुभवायला येते. एकावर एक रचलेल्या पाषाणातून या कुंडाची उभारणी असून कुंडाचे क्षेत्रफळ एक हजार स्क्वेअर फुट आहे. कुंडाची खोली दहा फूट असून आत जाण्यासाठी दोन बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. या कुंडातील पाणी आटत नसल्याचे येथील वृद्ध सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.