World Cancer Day : कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढतेय ; जागतिक कर्करोग दिन,महिलांनीही दक्ष राहण्याची गरज

कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कर्करोगाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, हे आशादायक चित्र आहे. तसेच कर्करोगाबद्दल समाजामध्ये जनजागृती वाढत आहे.
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कर्करोगाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, हे आशादायक चित्र आहे. तसेच कर्करोगाबद्दल समाजामध्ये जनजागृती वाढत आहे. त्यामुळे त्याची लक्षणे, उपचार आदींची माहिती आता सर्वसामान्यांना झाली आहे. तसेच लवकर निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे, ही आशादायक बाब आहे.

ता. चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाचे समूळ उच्चाटन होणे हे जसे आव्हान आहे त्यापेक्षाही मोठे आव्हान कॅन्सरची या आजाराची भीती कमी करणे आहे. तसेच सध्याची बदलती जीवनशैली, ताणतणाव, पुरेशी झोप नसणे तसेच खाण्यातील बदल या सगळ्यासोबतच काही जणांना असलेली वेगवेगळ्या प्रकारची व्यसने या सगळ्याचा मानवाच्या शरिरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्याचबरोबर कर्करोग होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे कर्करोगापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. विशेष करून महिलांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्याच्या काळात कर्करोगावरील उपचाराबाबत समजही वाढली आहे. तसेच आता परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळत आहेत. त्यामुळे रुग्ण बरा होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत चालले आहे.

nanded
Nanded News : शेतकऱ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा ; तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

कर्करोगाचे प्रमाण विशेष करून महिलांमध्ये वाढत आहे. स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण दहा स्त्रियांमध्ये तीन स्त्रिया इथपर्यंत येऊन ठेपले आहे. स्तनांच्या कर्करोगामध्ये बरीच जनजागृती झाली आहे. स्तनाच्या कर्करोगात स्तन काढणे हा पर्याय किमान वापरला जातो. दिवसेंदिवस कर्करोगाचे रुग्ण चांगले आयुष्यमान जगत आहेत.

परंतू स्तनांमध्ये आलेली कुठलीही गाठ ही कॅन्सरचीच आहे याचे भय मात्र नक्कीच कमी झाले पाहिजे. डाॅक्टरांनी निदान करण्याआधीच मला कर्करोग झाला की काय? ही भीती कमी होणे महत्वाचे आहे. तसेच मोबाईलवरून किंवा सोशल मीडीयातून आजाराची अधिक माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्ष डाॅक्टरांशी चर्चा करून जीवन सुखकर बनवू या.

- डॉ. अंजली डावळे, सर्जन, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.