भोकर : गावातील मतभेद गटतट विसरून सर्व गावकऱ्यांनी मिळून काम केले म्हणून आज हाडोळी (ता.भोकर) गाव स्वच्छ आणि सुंदर बनले आहे, एकोपा टिकून ठेवून काम केल्याने तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत विभागीय पातळी पर्यंत गाव गेले पाहिजे असा विश्वास भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी गुरुवारी (ता.२०) व्यक्त केला आहे.
हाडोळी गावाने स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत भाग घेतला असून गावातील रस्ते, सुंदर स्वच्छ गाव पाहण्यासाठी गुरूवारी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी भेट देऊन कौतुक केले आहे. सरपंच माधवराव अमृतवाड म्हणाले की, गावातील सर्व लोकांनी सहकार्य केल्यामुळे गटतट सोडून सर्व बालक युवक महिला ज्येष्ठ नागरिक या सर्वांनीच मनातून तळमळ केल्यामुळे हे यश गावाला प्राप्त झाले आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
या वेळी माजी सभापती शिवाजी देवकुळे, बी.आर. पांचाळ, ॲड. शेखरकुंटे, सरपंच रंगराव पाटील, अंबादास आटपलवाड, सुदाम आडे, संगपवाड गुरुजी, संदीप गौड आदींनी हाडोळी गावाच्या विकासाबाबत विचार मांडून इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे मत मांडले. या वेळी उत्तम पाटील, विजय पाटील मोरे, गजानन ढगे, धनराज जाधव, मल्लेश दंतुलवार, यांच्यासह दिगंबर लालवांडे, मारुती मुंडकर, गंगाधर हाडोळे, बाबुराव तोटावड, रामराव मुंनगे, संजय जाधव, संभाजी किनेवाढ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भोकर तालुक्यातील हाडोळी गावाचा पाया तसा प्रारंभी पासून विकास आणि एककोपानी भरलेला आहे. त्यामुळे आज हे चित्र दिसत आहे. मी पोस्टमन म्हणून काम करीत आहे. गावच्याबाबतीत कुठलीच अडचण भासू देणार नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. गावच्या विकासात भर घालण्यासाठी मी स्वतः ५१ हजार रुपयाची भेट देत आहे.
- जगदीश पाटील भोसीकर, सभापती भोकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.