अर्धापूर (जि.नांदेड) : काळ्या बाजारात जाणारा तेरा लाखांचा तांदूळ अर्धापूर - नांदेड रस्त्यावरील सत्यगणपती मंदिराच्या कमानीजवळ पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अर्धापूर (Ardhapur) पोलिस ठाण्यात चौंघाविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यावाही सोमवारी (ता.११) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तांदूळसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Thirteen Lakh Black Rice Seized In Ardhapur Of Nanded District)
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन ट्रकमधून विना परवानगी शासकीय योजनांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत आहेत, अशी गुप्त माहिती मिळाल्याने अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी सत्यगणपती मंदिराच्या कमानीजवळ आले. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता शासनाचा सार्वजनिक वितरण प्रणालीचा परवाना नसताना ट्रकमध्ये सहा लाख ५०हजार किमतीचे २७ टन तांदूळ व दुसऱ्या ट्रकमध्ये सात लाखांचा २७ टन तांदूळ जप्त करण्यात आला. असा एकूण दोन ट्रकसह ३७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nanded Crime Updates)
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हिराभाई रामभाई सिंधलं (वय २७ रा.राणावाव ता. राणावाव, जि.पोरबंदर, गुजरात ) भरत चन्नभाई ओडेदरा (वय ३२, रा.देवडा, ता.कुतीयला, जि. पोरबंदर, गुजरात), भास्कर सी गोपाल होनोने (रा.सैदाबाद, हैदराबाद), महंमद पाशा महंमद इस्माईल (रा.शांतीनगर मेंढक जहीराबद) यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन चालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पूढील तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.