नांदेड - जिल्ह्यात सोमवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या २९ अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत तीन अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. आजच्या घडीला २४ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ९६२ एवढी झाली असून यातील एक लाख २४६ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६९२ एवढी आहे. नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील दहा व जिल्ह्यातील तालुक्यातंर्गंत गृह विलगीकरणातील एक असे एकुण ११ रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरणात नऊ, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणातील १४ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीतील एक असे एकुण २४ व्यक्ती उपचार घेत आहेत.
नांदेड कोरोना मीटर
एकुण स्वॅब : नऊ लाख नऊ हजार ९१४
एकुण निगेटिव्ह : सात लाख ८९ हजार ६१२
एकुण बाधित : एक लाख दोन हजार ९६२
एकूण बरे : एक लाख २४६
एकुण मृत्यू : दोन हजार ६९२
उपचार सुरू : २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.