नांदेड : किनवटला सीटी स्कॅनसाठी तीन कोटी उपलब्ध

पालकमंत्री अशोक चव्हाण; उपजिल्हा रुग्णालयासाठी मिळणार
Ashok Chavan
Ashok Chavansakal
Updated on

नांदेड : किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतंर्गत ही तरतूद करण्यात आली असून जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहेत.

Ashok Chavan
हे सरकार जनतेचं की, दारुड्यांचं? तृप्ती देसाई संतापल्या

नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर हे तालुके आदिवासी बहुल आहेत. किनवटपासून नांदेडचे अंतर सुमारे १५० किलोमीटर असल्याने आपत्कालीन प्रसंगी या तालुक्यांमधील रुग्णांना योग्य निदान व उपचाराच्या सुविधेसाठी नांदेड किंवा आदिलाबादला धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. या परिसरातील रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवट येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सेवा-सुविधा भक्कम करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानुसार किनवट येथे उपलब्ध असलेल्या ट्रामा केअरच्या कुशल मनुष्यबळाला आता सिटी स्कॅनची जोड मिळणार असून, गंभीर दुखापत झालेल्या तसेच आजारी रुग्णांच्या तत्काळ अचूक निदानासाठी हे सिटी स्कॅन मशीन महत्वाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केला आहे.

Ashok Chavan
Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

किनवट तालुक्यात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आधुनिक यंत्रसामुग्रीने करता याव्यात, या दृष्टीने किनवट उपजिल्हा रुग्णालयात फेको मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे गरजूंना विना टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता येणे शक्य झाले आहे. या मशीनचा लाभ शेजारच्या तालुक्यातील नागरिकांनाही होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी दिली. या उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला तीनशे ते चारशे रुग्ण प्रथमोपचारासाठी येतात. महिन्याला ७० ते ८० महिलांचे बाळंतपण या ठिकाणी केले जाते. या रूग्णालयात ५० खाटांची मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.