नांदेड - यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ता. एक जून ते ता. ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील पाच लाख ६३ हजार ७२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये तीन लाख ६१ हजार १२८ हेक्टरवरील खरिप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ‘एनडीआरएफ’ च्या निकषानुसार २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
जिल्ह्यात यंदा जूनमध्ये पावसाला सुरवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली. या कालावधीत पावसाने दडी मारल्याने पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर समाधानकारक पावसामुळे सात लाख ६२ हजार १५८ हेक्टरवरील खरिप पिकांची परिस्थिती चांगली होती. त्यानंतर मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले.
नुकसानीचे सर्वे
या बाबत कृषी, महसूल व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीचे सर्वे केले. यात तीन लाख ६० हजार १२७ हेक्टरवरील जिरायती, सातशे हेक्टरवरील बागायती व तीनशे हेक्टरवरील फळपिक असे एकूण तीन लाख ६१ हजार १२८ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पाठविला होता. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून (एनडीआरएफ) जिरायतीसाठी प्रति हेक्टर सहा आठशे, बागायतीसाठी १३ हजार पाचशे तर फळपिकांसाठी अठरा हजार रुपये भरपाइ देण्यासाठी एकूण २४६ कोटी ३६ लाख २६ हजार २५६ रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. यात ऑक्टोबरमधील अतिवृष्टी तसेच पुरामुळे नुकसान झाल्याचा अंतर्भाव नसल्याची माहिती सूत्राने दिली.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र, नुकसान क्षेत्र व लागणारा निधी पुढीलप्रमाणे आहे.
२४६ कोटींची मागणी
नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरअखेर जिरायती, बागायती व फळपिक असे एकूण तीन लाख ६१ हजारावर हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासाठी लागणाऱ्या २४६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
- डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.