जन्मदाता निष्ठूर झाल्याने मुलींवर आली ‘ही’ वेळ...

file photo
file photo
Updated on

घोगरी (ता. हदगाव) : लहानपणीच आईचे छत्र हरवलेल्या दोन मुलींचा जन्मदाता झाला निष्ठुर झाला.त्याने दुसरा संसार थाटल्याने या निष्पाप मुली झाल्या पोरक्या झाल्या. घरची आर्थिक स्थिती नाजूक असूनही आजोळी मामाया दोन्ही मुलींचा सांभाळ करतो. मुली शिक्षणात हुशार असूनही “कोरोनामुळे” ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे महत्त्व वाढल्याने “ काळ तर मोठा कठीण आला” नाईलाजाने या मुलींना पुढील शिक्षण अर्ध्यावरती सोडण्याची पाळी आली आहे. या मुलींना समाजातील काही दानशुर व्यक्तीनी आर्थीक मदत केली तर नक्कीय या मुलींचे भविष्य उज्वल होण्यास मदत मिळेल. 

घोगरी (ता. हदगाव) येथील दिलीप जाधव यांची बहीण संगिता जाधव हिचा विवाह साकुर (ता. माहूर) समाधान हरणे यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यांचा संसार सुखाचा चालू असतानाच या सुखी संसाराच्या वेलीवरती कन्यारुपी दोन फुले उमलली. या दरम्यानच्या काळातच आई संगीता हरणे हिचे निधन झाले. मातेच्या मायेला पोरक्या झालेल्या मुलीचं (राजश्री हरणे वय दोन वर्ष व जयश्री हरणे केवळ पाच महिने) आजी करवी वर दुधावरती या मुलीचे संगोपन करण्यात आले. मामा दिलीप जाधव त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही त्यांनी आजवर देखभाल व मुलीच्या शिक्षणास प्राधान्य दिले.

जन्मदात्याना या दोन्ही मुलीचा विसर 

परंतु जन्मदात्याना या दोन्ही मुलीचा विसर पडला असून. त्याने आपले दुसरे लग्न करुन संसार थाटला. ते त्या संसारात रममान झाले. मात्र या दोन्ही मुलींकडे त्यांना पाहण्यासाठी वेळ नसल्याने या दोन्ही मुलीमंचा संभाळ मामा करत आहे. “नियतीचा खेळ निराळा” या दोन्ही मुलीचं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना तामसा, भोकर जावे लागत असे. शाळेच्या वेळेत एसटी (बस) नसल्याने त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असे. हे मामासाठी परवडणारे नसूनही मोलमजुरी करून त्यांनी आजवर त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. परंतु देशात “कोरोना” महामारीचे मूळ खोलवर पसरत असल्याने, राज्यात सर्वत्र टाळेबंदी लागू होण्याने शिक्षणासाठीचा काळ तर मोठा कठीण आला. शासनाच्या वतीने पर्यायी शिक्षण म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रणाली अमलात आणली आहे. मात्र हे गरीब असलेल्या मामाला शक्य नसल्याने त्याने या वर्षी या दोन्ही मुलींचे शिक्षण थांबविले. 

शासनाकडून आर्थीक मदतीची मागणी

या निराधार मुलींचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी काही समाजातील दानशुर व्यक्ती जर पुढे आल्या तर नक्कीच त्या मदतीमुळे या मुलीना आपले पुढील शिक्षण पूर्ण करुन त्या स्वावलंबी होऊ शकतात. या मुलींना आर्थीक मदतीची गरज असून त्यांना शासनाकडूनही काही शिक्षणासाठी मदत मिळाल्यास त्यांना भाग्य नक्कीच उजळेल असे मामा दिलिप जाधव यांनी सांगितले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.