11 महिण्याचा पगार थकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने अखेर कर्मचारी कारखान्याच्या गेट समोर तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत
मालेगाव (नांदेड): वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा 11 महिन्याचा पगार थकवला आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने अखेर कर्मचारी कारखान्याच्या गेट समोर तीन दिवसांपासून उपोषण करीत आहेत. परंतु या उपोषणाची कोणीही दखल घेतली नसून कोणताच तोडगा देखील काढण्यात आला नाही. उपोषण करणाऱ्यापैकी पाच जणांची तब्येत खालावली आहे.
या कारखान्याचे पाच गळीप हंगाम यशस्वीपणे पार पडले. परंतु अचानक यावर्षी कारखान्याच्या आर्थिक नियोजनात ताळमेळ नसल्याने कर्मचाऱ्यांचे 11 महिण्याचा पगार कर्मचाऱ्यांचा थकला आहे. जवळपास 400 कर्मचारी कारखान्यावर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. जवळपास अकरा महिन्यांचे पगार दोन कोटी 73 लाख रुपये थकले आहेत. तातडीने हक्काचा पगार द्यावेत या मागणीसाठी दिनांक 11 ऑगस्ट रोजी पासून कर्मचारी बेमुदत उपोषण बसले आहेत. आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून या उपोषणाची दखल अद्याप कारखान्याने घेतलेली नाही.
उपोषण करणाऱ्यांपैकी पाच जणांची तब्येत खालावल्याने त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले पाहिजे, असे वैद्यकीय अधिकारी तथा, आरोग्य तपासणी अधिकारी डॉक्टर्स, कुरुंदा यांच्या पथकाने पाहणी केली. तत्काळ 5 जणांना आरोग्य केंद्रात दाखल होण्याचे सांगितले. परंतु या कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रात जाण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचारी वर्गात वातावरण तापले असून याकडे संचालक मंडळींनी दखल घेऊन तात्काळ तोडगा काढावा अन्यथा बरंवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी कारखाना संचालकांवर राहील, असंही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, माजी संचालक देविदास कराळे पाटील, संभाजी ब्रिगेडचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांच्यासह विरोधी पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, पूर्णा कारखान्याचे कर्मचारी असोसिएशनचे पदाधिकारी भेटी देऊन पाठिंबा देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.