शिवणी (जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणी येथील (Kinwat forest) वनविभाग कार्यालयापासून पूर्वेस शेतक-याना आपल्या शेतीकडे जाण्याचा पांदण रस्ता गेल्या अनेक वर्षापासुन नादुरुस्त व अतीक्रमीत होता. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतात ये- जा करण्यासाठी फार मोठा त्रास होत असे. विशेष म्हणजे पावसाळ्यात शेतकरी तर सोडाच जनावरांना पण चिखलामुळे ये- जा करण्यासाठी त्रास होत असे. अखेर पाठपुरावा करुन सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजारा (IAS Kirtikumar pujara) यांनी पांदन रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने हा रस्ता मोकळा झाला. (Took - breath- on- the- paving- road- at -Shivani-Initiative- Kirtikiran -Pujar)
पावसाळ्यात पांदन रस्त्यात अनेकवेळा चिखलात जनावरे फसत असत. ह्या शेतक-याची आपली अडचन बालाजी आलेवार यांच्या लक्षात शेतक-यानी आणून दिली. त्यांनी किनवट- माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाला अर्ज देण्यात आले. व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजारा यांना कळवण्यात आले. त्यांनी मंडळ अधिकारी यांना पांदण रस्त्याची पाहणी करण्यासाठीचे आदेश दिल्याने मंडळाधिकारी एन. बी. सानप व तलाठी श्री. डुकरे यांनी ता. १८ मे रोजी पांदण रस्त्याची पाहणी करुन अतिक्रमण हटवण्यात आले.
हेही वाचा - फेसबुक मैत्री पडली महागात; अमेरिकन भामट्याकडून फसवणूक
पांदण रस्ता मोकळ करुन पंचनामा करण्यात आला. ता. १९ मे रोजी सकाळी बालाजी आलेवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पांदण रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. ता.२० मे रोजी येथील पांदण रस्ता पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आले. शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पांदण रस्ता मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. तर सहा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच पुजार, आ. भीमराव केराम, भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांच्या पुढाकाराने पांदण रस्ता दुरुस्त झाल्याने शेतकरी वर्गाने आभार व्यक्त केले. यात शेतकरी श्रीनिवास पंतनगीर, रमेश दासू, मल्लेश बेलयवार, रामराव देशामुखे, राजू मुद्दलवाड, भिल्लू जाधव, शंकर गाडेकर आदी उपस्थित होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.