अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण; का करावे वृक्ष लागवड? वाचा सविस्तर

जीवन जगण्यासाठी लागतो तो ‘प्राणवायू’ म्हणजेच ऑक्सीजन आणि तो मिळतो या झाडांपासून.
अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर
Updated on

नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती ता. ३१ मे रोजी आहे. मात्र सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच वाढलेले प्रदूषण आणि लागणारे शुद्ध ऑक्सीजन लक्षात घेता यावर्षी वृक्षारोपण करुन अहिल्यादेवी होळकर यांना सर्वांनी अभिवादन करावे असे आवाहन नवनाथ काकडे यांनी केले आहे.

जीवन जगण्यासाठी लागतो तो ‘प्राणवायू’ म्हणजेच ऑक्सीजन आणि तो मिळतो या झाडांपासून. यावरुनच कळते की आपल्या आयुष्यात झाडांचे किती महत्व आहे. “झाडे लावा, झाडे जगावा” हा नारा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे.

अगदी प्राचीन काळापासून झाडांसोबत माणसाचे अतूट नाते आहे. झाडे नसतील तर आपणही नसू या रुढीमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान झाडांना दिले आहे.

हेही वाचा - गुरुवारी (ता. २७) अखेर नांदेडच्या जिल्हाधिका-यांना वाळू घाटाचा खडतर प्रवास करुन कारवाई करावी लागली. चारचाकी वाहन जाईल तिथपर्यंत, त्यानंतर दुचाकी आणि पुन्हा पायी प्रवास करत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी वाळू घाट गाठले.

माणसाला रोजच्या जीवनात १५ किलोपर्यन्त प्राणवायू म्हणजेच ऑक्सीजन लागतो. आणि सात झाडे जेव्हा ऑक्सिजन सोडतील तेव्हा १५ किलो ऑक्सीजन होतो. झाडे ही आपल्याला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी व सुंदर देणगी आहे. ज्या परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असतील त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त बघायला मिळते व तिकडचा परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ वातावरणाचा दिसेल हवा ही शुद्ध असते.

अनेक संत, कवी, लेखक यांनी आपल्या लेखनातून झाडाचे महत्व सांगितले आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” झाडे आपले मित्र आहेत हे या वाक्यातून बघायला मिळते.

विविध जातीच्या झाडांचे काय आहेत फायदे ?

आंब्याचे झाड :-

“आंबा ” हा सर्वांनाच माहिती आहे. तसेच आंब्याच्या झाडाचे विशिष्ट महत्व व फायदेही देखील आहेत.

ते म्हणजे आंब्याचे संपूर्ण झाडाच कुठल्या न कुठल्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडते. आंब्याचे झाडाच्या पानाचा उपयोग हा घरामध्ये दरवाजाला तोरण बांधण्यासाठी होतो व विविध सजावटीमध्ये होतो. आंब्याचा बुधा, फांद्या यापासून टेबल, खुर्ची फर्निचरचे सामान बनविण्यासाठी आंब्याचे लाकूड वापरतात व आंब्याचे फळं “आंबा ” हे तर सर्वांचे आवडते व फळांचा राजा म्हणून ओळखले जाते.

तुळशीचे झाड :-

भारतीय संस्कृतीतील अतिशय धार्मिक महत्व असलेले तुळशीचे झाड वातावरणातील हवेला शुद्ध करण्याचे काम करते, तसेच पुराणानुसार तुळशीचे झाडाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढली जाते.

नारळाचे झाड :-

धार्मिक, व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाणारे नारळाचे झाड माणसाला विविध प्रकारे मानले जाते. “नारळ ” या फळाला पवित्र मानले जाते व धार्मिकतेचे तर नारळ हे फळ प्रतीकच आहे.

येथे क्लिक करा - उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी यांनी स्वतः गीत गायन करुन नागरिकांना कोरोना बाबतचे निर्बंध पाळण्याचे आवाहन केले. वसमत शहरातील प्रमुख चौकात त्यांच्या गायनाचा आगळावेगळा कार्यक्रम पहावयास मिळाला.

कडुलिंबाचे झाड :-

कडुलिंबाच्या झाडाला बहुपयोगी झाड म्हणून ओळखले जाते. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्वच अतिशय कडू असतात. या झाडाचे पानाचा रस पिल्याने लठ्ठपणा कमी होतो व या झाडाचे काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत तसेच मूळव्याध या रोगावर गुणकारी असते.

कढीपत्त्याचे झाड :-

रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा कढीपत्ता शरीरसाठी अत्यंत गुणकारी आहे. कढीपत्त्याच्या पानाचा रस रोज पिल्याने पचनशक्ती वाढली जाते, कढीपत्ता तारुण्य टिकून ठेवण्यास मदत करते. तसेच कढीपत्ता पानाचा रस केसांमध्ये लावल्याने केस गळती थांबते.

चंदनाचे झाड :-

सुगंधी वृक्ष म्हणून आपली वेगळीच ओळख ठेवत असलेले चंदनाचे झाड. हे झाड माणसाला अत्यंत उपयोगी ठरते. या झाडाच्या लाकडापासून सौदंर्य प्रसाधने बनविले जातात.

पळसाचे झाड :-

विशिष्ट औषधी गुणधर्म ठेवणारे हे पळसाचे झाड या झाडाच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी बनविले जाते व पळसाची फुले पाण्यात ठेवून ते पाणी पिल्याने पोटाचे विकार कमी होतात. अनेक जण फुलांच्या पाकळ्या चहामध्ये टाकून पितात.

हे उघडून तर पहा - बुरुड व्यावसायिकांवर कोरोनाचे सावट, अनेक कुटुंबावर आली उपासमारीची वेळ. शासनाने दखल घ्यावी अशी मागणी |

पिंपळाचे झाड :-

अतिशय पवित्र मानले जाणारे हे पिंपळाचे झाड अनेक धार्मिक गोष्टीशी निगडीत आहे. या झाडाचे लाकूड मजबूत असते ते दरवाजे, खिडकी बनवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. विशेष म्हणजे पिंपळ २४ तास प्राणवायु सोडते.

आपल्या वातावरणाला शुद्ध, निरोगी ठेवण्यासाठी झाडे उपयुक्त ठरतात. वातावरण थंड ठेवण्यामागेही झाडांचे योगदान आहे. अशा प्रकारे झाडे मानवाला बहुपयोगी ठरतात. व आर्थिकदृष्ट्याही देखील मदत करतात. वातावरणामध्ये होणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. शरीरासाठी पोषक व आवश्यक असणारे अन्नही झाडांपासून प्राप्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.