शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणीपासून तीन किलोमीटर अंतरावर आदिवासी पाडा वसला असून या पाड्यावर अजूनही विज नाही. येथे आदिवासी कुटुंबाची शेती आहे. गावात राहून शेतीची कामे वेळेवर होत नसल्याने ही कुटुंब गेल्या वीस वर्षापासून आपल्या शेतातच वास्तव्यास आहेत.
शासनाकडून मागेल त्याला वीज कनेक्शन जीवन प्रकाश योजनेतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्यात येत आहे. या आदिवासी पाड्यावर राहणारे कुटुंब गेल्या दोन वर्षाखालील महावितरणकडे वीज कनेक्शनची मागणी करुन प्रत्येक कुटुंब वीजेच्या कनेक्शनसाठी तीन हजार पाचशे रुपयांचा भरणा केला असून दोन वर्षाचा कालावधी होऊनही या आदिवासी कुटुंबाला आजपर्यंत विजेचे मीटर व कनेक्शन देण्यात आले नाही.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे या सात कुटुंबाला वीज पुरवठा नसतानाही प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच हजाराची वीज वापराची बिल मात्र मिळाली आहेत. हे कुटुंब विज वितरण कार्यालय इस्लापूर येथील विज वितरणच्या अभियंत्याला भेट देऊन त्यांनी अनेक वेळा विनंती केली की आम्हाला वीज नसल्याने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही, अंधाऱ्या रात्रीत विषारी साप, विंचु यांची भीती तसेच जंगल जवळ असल्याने जंगली प्राण्यांची भीती आहे. असे अनेक प्रश्न सतावत असतात. त्यामुळे महावितरणने आम्हाला विजेचे कनेक्शन लवकरात लवकर द्यावे अशी मागणी आदिवासी कुटुंब करीत आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.