नांदेड : हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड येथील कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूरी मिळाली आहे. तसेच खाटांची क्षमतासुद्धा ३० वरुन १०० करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी उमरखेड येथे कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सूतोवाच केले होते. सोबतच येथील रुग्णालयात पदे भरण्यास सुद्धा मंजूरी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड तालुक्याचा आवाका पाहता २०१३ मध्ये शासन निर्णयानुसार ३० खाटांचे कुटीर रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आठ वर्षाच्या कालावधीनंतर तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण यामुळे कुटीर रुग्णालयाची यंत्रणा पुरेशी होत नव्हती. यामुळेच उमरखेड तसेच महागाव तालुक्याची गरज लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला होता. त्याकरिता शासन स्तरावर पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता.
हेही वाचा - जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करु- जयंत पाटील
नुकतेच मे महिन्यात झालेल्या उमरखेड येथील एका कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सूतोवाच करुन सांगितले होते की, येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. अवघ्या एक महिन्याच्या आत याकामास मंजूरी मिळाली आहे. हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा सक्षम राहावी सर्व सामान्य जनतेला आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, वेळेत उपचार मिळावेत याकरिता खासदार हेमंत पाटील दक्ष आहेत.
कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना तात्काळ उपचार, ऑक्सिजन बेड, प्रतिबंधात्मक लस, ऑक्सिजन पुरवठा आरक्षित करुन ठेवला होता. तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे, त्याठिकाणी मनुष्यबळ भरतीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला होता. त्याच अनुषंगाने उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी आणि मनुष्यबळ भरती करण्यास मंजूरी देण्यात आले आहे. यामुळे उमरखेडसह महागाव, पुसद तालुक्यांना याचा लाभ होणार आहे.
येथे क्लिक करा - कुर्ला-CSMT मार्ग बंद; मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.