Nanded News : बेरोजगार तरुणांची शहरांकडे धाव; अर्धापुरात एकही मोठा उद्योग, व्यवसाय नसल्याने भटकंती

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाला काम करण्यासाठी तरुणा़ंची गरज असते पण त्यांच्या हाताला काम देण्यासाठी कोणीही ठोस काम केले नाही. तालुक्यात पंचवीस वर्षांत एकही मोठा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
unemployed youth towards city to find job to set up career nanded
unemployed youth towards city to find job to set up career nandedSakal
Updated on

अर्धापूर : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाला काम करण्यासाठी तरुणा़ंची गरज असते पण त्यांच्या हाताला काम देण्यासाठी कोणीही ठोस काम केले नाही. तालुक्यात पंचवीस वर्षांत एकही मोठा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

परिणामी तरूणांना रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. एक साखर कारखाना वगळता एकही मोठा उद्योग नाही. तालुक्यात केळीचे क्षेत्र मोठे असले तरी प्रक्रिया उद्योगाचा पत्ता नाही.

अर्धापूर तालुका निर्मितील तब्बल २४ वर्षे लोटली आहेत. नांदेडजवळ असल्याने तालुक्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतीवर आधारित उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.तालुक्यात एक सहकारी साखर कारखाना आहे.याशिवाय एकही मोठा उद्योग नाही.

तालुक्यात सुशिक्षित तरुणांची संख्या खूप मोठी आहे. शासकीय नोकरभरती होत नसल्याने खासगी नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांत जावे लागते. नांदेड परिसरात उद्योग व्यवसायाला वाव असतानाही मोठे उद्योग आले नाहीत. या परिसरात उद्योग व्यवसाय सुरू झाले तर स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण असताना मोठे उद्योग उभारले गेले नाहीत.

मी उच्च शिक्षित तरूण असून रोजगाराच्या शोधात आहे. शासकीय नोकर भरती होत नसल्याने हाताला काम नाही. खासगी नोकरी करावी तर उद्योग व्यवसाय नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.

- गंगाधर गंधनवाड, अर्धापूर.

अर्धापूर तालुक्यात केळीचे लागवडी क्षेत्र खूप मोठे आहे. केळी व इतर शेतीमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र अद्याप एकही प्रक्रिया उद्योग सुरू झाला नाही.

-राजेश कानडे, केळी उत्पादक, अर्धापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()