Nanded News : असमान पर्जन्यमानासोबतच कीड-रोगांमुळे उत्पादनात घट

जिल्हाधिकारी राऊत यांचे प्रतिपादन
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : पर्जन्याचे असमान वितरण, रोगराई, किटकांचा प्रादुर्भाव यामुळे नांदेड जिल्ह्यातील खरिपातील पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यात यंदा वार्षीक पर्जन्यमान सरासरीपर्यंत पोचल्याचे दिसत असले तरी शेतकऱ्यांचे जीवन-मरण सरासरीवर आधारित असू शकत नाही, असे ठाम मत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मांडले आहे.

जिल्ह्यातील खरीप पीक नुकसान स्थिती संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘सकाळ’शी मंगळवारी (ता..२६) संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून नेसर्गीक संकटांशी दोन हात करत त्यांच्या समोरील आव्हानांचा आढावा घेतला. सोयाबीन हे नांदेड जिल्ह्याचे खरिपातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यात दरवर्षी जवळपास चार लाख हेक्टरवर सोयाबीन पीक घेतले जाते. मागील खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात लाख पेरणी झालेल्या क्षेत्रापेकी तब्बल चार लाख ३४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.

३०० मिलिमीटर पाऊस होऊन नुकसान

पीक विमा कंपनीने स्वतंत्र सर्वेक्षण केले. यात अतिवृष्टी हा ट्रिगर घेऊन मध्यावधी नुकसान जाहीर केले आहे. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम विमा मिळावा, यासाठी अधिसूचना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळाला. काही मंडळामध्ये एका दिवसात ३०० मिलिमीटर पाऊस होऊन पीक नुकसान झाले. पावसाच्या या असमान वितरणामुळे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरीच्या जवळ येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.