Women Collector : महिलाराज; विविध जिल्हयात जिल्हाधिकारी पदी महिलांची वर्णी

लातूरच्या जिल्हाधिकारीपदी प्रथमच महिला, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूरला जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे.
Women Collector : महिलाराज; विविध जिल्हयात जिल्हाधिकारी पदी महिलांची वर्णी
Updated on

नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूरला जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या या बदलीमुळे लातूर जिल्हाधिकारीपदी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे.

ठाकूर-घुगे यांच्या सध्याचा पदभार औरंगाबादचे विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे आदेश सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी शुक्रवारी दिले. गेल्या तीन वर्षांपासून घुगे-ठाकूर नांदेडला कार्यरत असून गेल्या सव्वा वर्षापासून प्रशासक म्हणूनही कार्यरत होत्या.

नांदेडला त्यांच्या जागी मीनल करनवाल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. श्रीमती करनवाल या सध्या नंदुरबार येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होत्या.

लातूरला अनमोल सागर नवे ‘सीईओ'

लातूर येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची बदली झाली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा ठाकूर-घुगे तर मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनमोल सागर यांची नियुक्ती झाली आहे.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची दोन जूनला राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी बदली झाली होती. पण ११ जुलैला बदली रद्द करण्यात आली होती. आता पृथ्वीराज बी. पी. यांची नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी वर्षा ठाकूर-घुगे येत आहेत.

लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांची धुळे येथे जिल्हाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदियाचे सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांची बदली झाली आहे.

Women Collector : महिलाराज; विविध जिल्हयात जिल्हाधिकारी पदी महिलांची वर्णी
Collector : जिल्हाधिकारी होण्यासाठी....!

परभणी जिल्हाधिकारीपदी गावडे

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची नियुक्ती झाली आहे.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांनी येथे लौकिक मिळवला होता.

Women Collector : महिलाराज; विविध जिल्हयात जिल्हाधिकारी पदी महिलांची वर्णी
Nashik District Collector : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची बदली; 'हे' आहेत नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

पांचाळ जालन्याचे जिल्हाधिकारी

जालना येथील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची मुंबईत महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ येणार आहेत.

डॉ. राठोड यांचा जिल्ह्यात दोन वर्षांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला होता. त्यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वी राबविले होते. शिवाय नदी स्वच्छता मोहिमेत ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.