Vegetables Price : भाजीपाल्याचे दर ८ ते १० दिवसांत घसरणार; आवक वाढल्याचा परिणाम, ग्राहकांच्या खिशाचा भार हाेणार हलका

भाज्यांची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाचा भार हलका झाला आहे.
Vegetables Price
Vegetables Price Sakal
Updated on

Nanded News : भाज्यांची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाचा भार हलका झाला आहे. हे भाव ८ ते १० दिवसांत आणखी घसरणार असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात कोबी,दोडके, मिरची यासह इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहे. भाजीपाल्याच्या वाढलेल्या भावामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट बिघडले होते. पाऊस समाधानकारक नसल्यामुळे गत महिन्यात भाव वाढले होते. परंतु भाज्यांची आवक वाढल्यामुळे आता भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. नांदेड बाजारपेठेत टोमॅटोने शंभरी गाठली होती.

सोबतच गोबी,दोडके व मिरचीने सुद्धा शंभरचा टप्पा ओलांडला होता. सध्याला लसूण आणि अद्रकचे दर जशास तसे आहे. परंतु टोमॅटो, दोडके आणि मिरची हे ८० रुपये किलो दराने बाजारपेठेत विक्री केल्या जात आहे.

दर काही प्रमाणात घटले असले तरी येणाऱ्या आठ ते दहा दिवसात हा आकडा आणखी खाली जाणार असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांचे मत आहे. पावसाळ्यामुळे शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये चांगल्या प्रमाणात भाजीपाल्यांचा पुरवठा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. उत्पादन आणि पुरवठा साखळीतील सुरळीतता यामुळे दरात घट होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्यामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे. बाजारपेठेत आवक वाढली आहे. यामुळे भाजीपाल्यांचे भाव थोड्या प्रमाणात उतरले असून येणाऱ्या आठ ते दहा दिवसात भाजीपाल्यांचे भाव आणखी उतरतील.

— शोभाबाई धाडेराव, भाजीपाला विक्रेत्या

Vegetables Price
Nanded : दूषित पाणी पिल्याने सहा विद्यार्थिनी गंभीर; हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल, शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

भाजीपाल्यांचे दर (किलोमध्ये)

  • लसूण -२४०

  • अद्रक - २००

  • कोथिंबीर - १८०

  • शिमला -८०

  • दोडके -८०

  • पत्ता गोबी -८०

  • मिरची -८०

  • गवार -८०

  • टमाटे - ८०

  • बीट -६०

  • वांगे -६०

  • आलू -५०

  • कांदे -५०

  • पालक -४०

  • भेंडी - ४० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.