नांदेडच्या ‘या’ कार्यकर्त्याला उपराष्ट्रपतींचा फोन...? काय म्हणाले वाचा

file photo
file photo
Updated on

नांदेड- मंगळवार (ता. १९) वेळ दुपारी साडेतीनची. घरात फोन खनखनला.. मी उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडु यांचा स्वीय सहाय्यक राष्ट्रपती भवन येथून सचीन बोलतोय. माझे जी. नागय्या यांच्याशी बोलणे होत आहे का? असे विचारताच हो म्हंटल्यानंतर आपल्याशी उपराष्ट्रपती बोलणार आहेत म्हणून फोन उपराष्ट्रपती यांच्याकडे दिला. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दोन मिनीटात सर्व तेलगु भाषेतून विचारपूस केली. तसेच नांदेडमधील तेलगु समाजाबद्दलही त्यांनी विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. 

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याकडून काँग्रेसचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते जी. नागय्या यांची दूरध्वनीवरून आस्थेवायिकपणे विचारपूस झाली. जी. नागय्या आणि व्यंकय्या नायडु हे आंध्रप्रदेश मधील नेल्लुर जिल्ह्यातील उदयगीरी येथील रहिवाशी आहेत. जी नागय्या हे नायडु यांचे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासमवेत राजकारणात सक्रीय होते. परंतु कांलातराणे जी. नागय्या व्यावसायासाठी ते नांदेडला स्थायीक झाले. तरीसुध्दा या दोघांचे संभाषण नेहमी फोनवरुन होत असल्याचे नागय्या यांनी सांगितले.  

अधूनमधून त्यांचा व नागय्या यांचा संपर्क 

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आंध्रप्रदेशच्या नेलूर जिल्ह्यातील उदयगिरीचे आमदार होते. त्यावेळी नागय्या यांचा जवळून संबंध आला होता. उदयगिरी हे जी नागय्या यांचे जन्मगाव असल्याने नागय्या यांची नायडू यांची जुनी ओळख. ही ओळख कायम टिकवून ठेवत उपराष्ट्रपती झाल्यानंतरही नायडू आपल्या जुन्या सहकारी मित्रांना विसरले नाहीत. अधूनमधून त्यांचा व नागय्या यांचा संपर्क टिकून आहे. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी खास करून नागय्या यांना मंगळवारी (ता. १९) टेलिफोन केला आणि आस्थेने विचारपूस करून हिम्मत दिली.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा ५० वर्षांपूर्वीचा ऋणानुबंध

नागय्या यांच्या व्यक्तीगत चौकशीबरोबरच नांदेडसह महाराष्ट्रामधील सध्यस्थिती काय आहे याची माहिती जाणून घेतली. नागय्या यांचा आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा ५० वर्षांपूर्वीचा ऋणानुबंध पुन्हा नायडू यांनी वाढविल्याबदल नागय्या यांनी उपराष्ट्रपती महोदयांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ही त्यांची नांदेडकरांना ओळख. तसेच हिंगोली नाका परिसरात त्यांची जी. नागय्या नावाची मोठी हॉटेल व लॉजींग असल्याने अनेक राजकिय पदाधिकारी या ठिकाणी वास्तव्यास राहतात. जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली नानक साई फाऊंडेशनच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बंधुभाव निर्माण करून सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.


रक्ताची नाती दुरावत असतांना मैत्रीभाव कायम

संबंध जगभरात कोरोना या अतिगंभीर आजाराने थैमान घातले आहे. या विषाणुपूढे जगातील काही महासत्ता असलेल्या देशांनी गुडघे टेकविले आहे. संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. या काळात आपली रक्ताची नाती दुरावत चालली आहे. तरीसुद्धा समाजात रक्ताच्या नात्यापेक्षा आपली म्हणणारी माणस अजूनही जीव्हाळा व आपुलकी जपणारी आहेत. त्याचाचा जीवंत अनुभव नागय्या कुटुंबीयाना आला. एवढ्या मोठ्या संकटात देशाचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी विचारपुस केल्याबद्दल नागय्या कुटुंबीय भारावून गेले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.