Video - ताणतणाव घालवा...मेंदूचे आजार पळवा... - डॉ. संदीप देशपांडे

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे
Updated on

नांदेड - दैनंदिन जीवनात वाढत जाणारे ताणतणाव तसेच अनुवंशिकता आणि मानसिक पातळीवरील होणाऱ्या बदलांमुळे मेंदूशी निगडीत असलेल्या छिन्नमनस्कता (स्कीझोफ्रेनिया) आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे याबाबत असे रुग्ण वेळीच डॉक्टरांकडे आले आणि त्यांच्या आजाराचे निदान तसेच लवकर उपचार झाले तरच रुग्ण बरे होण्यास तसेच भविष्यात आशादायी चित्र निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नांदेडचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

जगभरात ता. १७ ते ता. २४ मे हा आठवडा जागतिक स्कीझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर ता. २४ मे हा दिवस जागतिक स्कीझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिन म्हणून साजरा केला जातो. नांदेडला देखील दरवर्षी मानसरोगतज्ज्ञ संघटना साजरा करते पण यंदा कोरोना आणि लॉकडाउनमुळे कार्यक्रम घेण्यात आला नाही. या आजाराबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी संवाद साधला. 

काय आहे हा आजार
स्कीझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) हा आजार मेंदूशी निगडीत गंभीर स्वरुपाचा आहे. या आजाराचे प्रमाण एक टक्के असून शंभर व्यक्तीमागे एक रुग्ण असतो आणि त्याची व्याप्ती खूप असून दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष करुन १५ ते २५ या वयोगटात हा आजार घाला घालतो. त्यामुळे गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर या आजाराबाबत समाजातही फारशी जनजागृती नाही. त्यामुळे रुग्ण किंवा त्याचे पालक, नातेवाईक हे देखील उशीराने रुग्णाला घेऊन डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे आजार वाढला त्यावर उपचार करणे क्लिष्ट होऊन जाते. 

ही आहेत आजाराची कारणे 
हा आजार अनुवंशीकसुद्धा आहे. घरात कुणाला असेल तर तो पिढ्यांमध्येही होऊ शकतो. त्याचबरोबर मानसिक पातळीवरही याकडे पहायला हवे. दैनंदिन जीवनात वाढत जाणारा ताणतणाव, पूर्वीच्या काही कटू आठवणी तसेच घटना, सदोष व्यक्तीमत्व आणि पालकत्व आणि सामाजिक परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. मानवाच्या मेंदूशी निगडीत कार्यामध्ये अडथळे येणे. केमीकल इनबॅलन्स आढळणे. मेंदूमध्ये डोपामीन नावाचे द्रव्य असते त्याचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळल्यानंतर हा आजार होतो. 

काय आहेत आजाराची लक्षणे
हा आजार झालेल्या रुग्णामध्ये आचार, विचार, भावना आणि वर्तणूक यामध्ये विस्कळीतपणा आणि अस्ताव्यस्तपणा येतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती समाजामध्ये एकरुप होऊन राहणे अवघड असते. त्यांची शारिरिक आणि मानसिक क्षमताही कमी होत जाते. पॅरामाईड स्कीझोफ्रेनिया आजारामध्ये संशयी वृत्ती वाढते. चिडचिडेपणा येतो. भ्रम आणि भास होतात. स्वतःशीच बडबड करतात. वास्तवाची त्यांची नाळ तुटते. अभासी जगात वावरतात. कुणीतरी आपल्याला मारत किंवा छळत असल्याची भावना तयार होते. 
 

 

हे आहेत उपचार...
स्कीझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) आजाराच्या रुग्णावर शारिरिक, मानसिक आणि समाजोपचार असे एकत्रित उपचारपद्धती अवलंबवावी लागते. आता चांगली औषधोपचार पद्धतीही विकसीत झाली आहे. यात सर्वांत महत्वाचे म्हणजे आजाराची लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ डॉक्टरांकडे रुग्ण पोहचले तर वेळीच निदान आणि उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे रुग्णांचा प्रवास देखील चांगला आणि आशादायी होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईक, मित्रांची भूमिकाही महत्वाची आहे. 
- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.