Video - केदार जगद्‍गुरूंनी केली केदारनाथला महापूजा

केदारनाथ येथे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी विधिवत पूजा केली.
केदारनाथ येथे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी विधिवत पूजा केली.
Updated on

नांदेड - बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ येथील जगद्‍गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सोमवारी (ता. पाच) विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यांनी विश्वशांती व मानव कल्याणासाठी केदारनाथाची विधिवत पूजा केली.

जिल्ह्यातील शिराढोण मठाचे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी हे २००१ पासून केदारपीठ रावल या गादीवर केदार रावल जगदगुरू म्हणून विराजमान आहेत. गेल्या वीस वर्षांपासून प्रतिवर्षी या परंपरेचे पालन करून त्यांच्या हस्ते केदारपीठाचे कपाट उघडून विधिवत पूजा करण्यात येते. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येते. परंतु श्री केदार जगद्‍गुरु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नांदेड येथे अडकून पडले होते. 

लॉकडाउनमुळे झाली होती अडचण
या सोहळ्यास जाण्यासाठी श्री केदार जगद्‍गुरु यांनी सर्व तिकिटे आधीच आरक्षीत केली होती. परंतु कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. अशा वेळी निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रवास परवाना मिळूवन दिला. त्यानंतर श्री केदार जगद्‍गुरु यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवास परवाना बुधवारी (ता. १५) सुपुर्द केला. राज्य शासनाचे पत्र दिल्यानंतर जगद्‍गुरूंनी नांदेडचे माजी सभापती किशोर स्वामी व सहकाऱ्यांसह स्वतंत्र वाहनाने नांदेडहून प्रयाण केले होते. 

अक्षयतृतीयेला उघडते मंदिराचे कपाट
श्री केदारनाथ मंदिराचे दरवर्षी दिवाळीला कपाट बंद होत असते. त्यानंतर अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येते. हे दोन्ही धार्मिक विधी श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल जगद्‍गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्तेच होत असतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर श्री केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट श्री केदार जगद्‍गुरु यांच्याकडे तो सहा महिने असतो. अक्षयतृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा श्री केदारनाथांच्या मुर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे श्रीकेदार जगद्‍गुरु यांना अनन्यसाधारण महत्व आहे.

केदारनाथाची केली विधिवत पूजा
तिथे पोचल्यावर ओंकारेश्वर मंदिर ओखीमठ (उत्तराखंड) येथे क्वारंटाइन व्हावे लागले. क्वारंटाइन काळ संपण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे ता. २९ रोजी कपाट उघडण्याची ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून जगद्‍गुरूंनी तिथीनुसार मंदिराचे कपाट उघडण्यासाठी आदेशीत केले. विधिवत अभिषेक आणि पूजा करण्यात आली. क्वारंटाइन काळ संपल्यानंतर सोमवारी (ता. पाच) जगद्‍गुरूंनी विधिवत पूजा व अभिषेक केला. त्यांनी केदारनाथाची विश्वशांती व मानव कल्याणासाठी विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत किशोर स्वामी व इतर उपस्थित असल्याची माहिती उखीमठ येथून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.