Video - तब्बल ५६ दिवसांनी दिसले व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान...

नांदेड - ५६ दिवसांनी अनेकांनी व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने उघडली.
नांदेड - ५६ दिवसांनी अनेकांनी व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने उघडली.
Updated on

नांदेड - एक दोन दिवस नव्हे तर तब्बल ५६ दिवसांनी अनेकांनी आपआपली व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने उघडली. ग्राहकांनी देखील लॉकडाउनचे पालन करत खरेदी केल्यामुळे व्यापाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने उघडल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही फायदा झाला आहे. 

जगातील अनेक देश आजही कोरोनाचा मुकाबला करत आहेत. भारतात देखील गेल्या ५६ दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. अखेर केंद्र आणि राज्य सरकारने काही नियम व अटी, शर्ती ठेऊन दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून (ता. १८) नांदेड शहर आणि जिल्ह्यातील दुकाने सुरु झाली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून यापूर्वी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात अंशत: बदल करुन आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेत चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत कंटनमेंट झोन वगळता सामाजिक अंतराचे व नमूद सुचनांचे पालन करण्याचे अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे अनेकांना फटका
कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. त्यात व्यापारी आणि उद्योजक यांचे नुकसान मोठे आहे. त्याचबरोबर दुकाने, प्रतिष्ठाने यावर अवलंबून असणारे इतर रोजगार, कामगार, हमाल यांना देखील आर्थिक फटका बसला. गेल्या ५६ दिवसांपासून दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. आर्थिक नुकसान झाले. आता ५६ दिवसांनंतर दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांनी देखील खरेदीसाठी गर्दी केली होती. 

सोशल डिस्टिन्सिंगचे करावे लागणार पालन
दरम्यान, काही ठिकाणी ग्राहकांनी तसेच दुकानांदारांनी देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे दिसून आले. दुकानांवर ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे दुकानातील कामगारांना ग्राहकांना सूचना द्यावा लागल्या. काही ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही पथकाद्वारे येऊन पाहणी करुन गेले. त्यांनी देखील दुकानदार आणि ग्राहकांना सोशल डिस्टिन्सिंगच्या संदर्भात पालन करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर हॅण्डवॉश, सॅनिटायझर यांचा वापर करण्याच्या तसेच तोंडाला मास्क लावण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

अशी सुरु राहणार दुकाने
सोमवार ते शुक्रवार (शनिवार व रविवार वगळून) या पाच दिवशी टोमोबाईल्स, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉपी, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी, बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल ही दुकाने सुरु राहतील व या दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहील. तसेच रविवार वगळून सोमवार ते शनिवार असे सहा दिवस दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहील. रविवारसह दररोज शेतीविषयक-बी, बियाणे, औषधे इत्यादींची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. हॉस्पीटल, मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ २४ तास दररोज देण्यात आली आहे. 

वेळ वाढवून द्यावी
गेल्या ५६ दिवसांपासून बंद असलेली दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. दुकाने सुरु झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा तसेच ग्राहकांचाही फायदा झाला आहे. गेल्या दीड महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने व्यापाऱ्यांनाही मदत करावी त्याचबरोबर सकाळी सात ते दुपारी दोन अशी वेळ देण्यात आली असून त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळू, असे आश्‍वासनही व्यापाऱ्यांनी दिले आहे. 
- प्रणव मनूरवार, चिटणीस, भाजपा व्यापारी आघाडी , नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.