Video; सलून व्यावसायिकांच्या उत्पन्नाला लॉकडाउनमुळे ‘कात्री’   

saloon
saloon
Updated on

नांदेड : ‘कोरोना’च्या लॉकडाउनने अनेकांच्या वाढलेल्या केसांना तब्बल दोन महिन्यापासून कात्रीच लागली नाही. त्यामुळे काहींनी केस आणि दाढी वाढवणे पसंद केले तर काहींनी मधला मार्ग शोधत चक्क टक्कल करण्याला पसंती दिली. बच्चेकंपनीदेखील वाढत्या केसांमुळे हैराण झाली तसेच महिलावर्गालाही ब्यूटी पार्लर बंद असल्यामुळे मेकअपपासून दूर रहावे लागत आहे. तर दुसरीकडे सलून व्यावसायिकांचा रोजगार बुडाल्याने ते तात्पुरता दुसरा व्यवसाय करत आहेत. काहींनी कर्ज काढून दुकाने सुरु केली मात्र, लॉकडाउनमुळे त्यांच्या व्यवसायातील भरघोस उत्पन्नाला कात्री लागली आहे.    

शहरात जेन्टस हेअर सलून, ब्यूटी पार्लर यांची संख्या शेकडो आहे. लॉकडाउन कालावधीत ही दुकाने अत्यावश्‍यक सुविधेत समाविष्ट न केल्याने ती मागील दोन महिन्यापासून बंद आहेत. या कालावधीत जेवढी ग्राहकांची गैरसोय झाली त्याहून अधिक आर्थिक परिणाम या व्यावसायिकांवर झाला. दुकाने बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला. अनेक व्यावसायिक शासनाच्या मदतीविना कर्मचाऱ्यांच्याही घरसंसाराला मदत करुन दुकाने सुरु होण्याची वाट पाहत आहेत. 

सलून व्यवसायाची साधी दखलही नाही 
शासनाने लॉकडाउन जाहीर केला, त्याचे काटेकोरपणे पालन जिल्ह्यासह राज्यभरातील सलून व्यावसायिकांनी केले. मागील ६० दिवसांपासून दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम खूप गंभीर झाला आहे. सलून सुरु करण्यासाठी सध्या लाखोंची गुंतवणूक करावी लागत आहे. हे करताना अनेकांनी बॅंकेचे कर्ज काढले आहेत तर काहींनी भाडेतत्वावर दुकाने घेत व्यवसाय सुरु केला. दररोजचे उत्पन्न हाती आले तर महिन्याचे गणित त्यावर अवलंबून आहे. सध्या दोन महिने व्यवसाय बंद ठेवणाऱ्या नाभिक समाजाच्या परंपरागत व्यवसायाबद्दल सरकारने एक शब्दही काढला नाही. मदत किंवा पॅकेज तर दूरच, अशी टिका अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखविली. 

असे करणार नियमांचे पालन 
सलूनची दुकाने सुरु झाल्यानंतर कटींग, दाढी यासह मसाज आणि इतर सर्व कामे करताना कटींगचे ॲप्रॉन, डिस्पोजल साहित्य वापरण्यावर भर दिला जाणार आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे सॅनिटायजेशन करुन मगच प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी एक ग्राहक दुकानातून बाहेर पडल्याशिवाय दुसऱ्या ग्राहकाला प्रवेश देणार नाही. यामुळे नियमांचे पालन होइल आणि ग्राहक सुरक्षित राहतील. 

आर्थिक नियोजन बिघडले
सध्या माझे दोन सलून दुकाने आहेत. ज्यात एक जेन्टस पार्लरस आणि एक ब्यूटी शॉप. इथे १५ जणांचा स्टाफ आहे. लॉकडाउनने सर्व गणित बिघडले आहे. व्यवसायासाठी लाखोंचे कर्ज घेतले आहे. तसेच बॅंकेचे हफ्ते, मेन्टनंस आणि स्टाफच्या पगाराचाही विचार करावा लागतो. शासन साधी दखल घेण्यास तयार नाही. व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्‍न पडला आहे.  
- सुर्यकांत भालेराव, सलून व्यावसायिक.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.