Video - सीमेपर्यंतचा मजूरांचा प्रवास ‘लालपरी’ करणार सुखकर

नांदेड - लालपरीमुळे कामगार, मजूरांना दिलासा
नांदेड - लालपरीमुळे कामगार, मजूरांना दिलासा
Updated on

नांदेड - आपआपल्या गावाच्या ओढीने पायी निघालेल्या परप्रांतातील मजुरांसाठी राज्यातील लालपरी मदतीला धावली आहे. राज्य सरकारने पायी जाणाऱ्या कामगार, मजूरांना मोठा दिलासा दिला असून लालपरीमुळे हजारो मजूरांची पायपीट काही अंशी का होईना थांबण्यास मदत होणार आहे. त्या त्या राज्याच्या सीमेपर्यंत एसटी बसद्वारे सोडण्यात येत असल्याने शेकडो किलोमीटरचा खडतर प्रवास प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखाचा झाल्याने मजुरांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

कोरोनामुळे देशभरात गेल्या ४५ दिवसापासून लॉकडाउन आहे. त्यामुळे हाताला काम नाही. अशातच राज्यात कामाच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय मजूर आता शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या गावी निघाले आहेत. अशा मजुरांना कोणीच थारा देत नसल्यामुळे काही ठिकाणी उपाशीपोटी त्यांना प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिक तसेच सेवाभावी संस्था त्यांच्या त्यांच्या परीने सहकार्य करत आहेत. त्यांच्या जेवणाची आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

हेही वाचा - Video :  Video :  ‘मदर्स डे’ :  आईसाठी मुलाने मॉरेशिसमधून असे गायले गाणे...
एसटी बसची झाली मोठी मदत

नांदेड शहर आणि जिल्ह्यातही हजारो मजूर अडकलेले आहेत. या मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आता प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. रेल्वे तसेच बससेवा बंद असल्यामुळे मिळेल त्या वाहनांनी हे कामगार, मजूर आपल्या कुटुंबियांसह जात होते. काही ठिकाणी जिल्ह्याच्या सीमेवर त्यांना प्रशासन ताब्यात घेऊन क्वारंनटाइन करण्यात येत होते. आता १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्यांच्याबाबत पुढील कार्यवाही काय करावी, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा वेळी हजारो कामगार, मजूर कुटुंबियांसह आपआपल्या गावी पायी चालत जात असल्यामुळे राज्य सरकारने अशा कामगार, मजूरांना एसटी बसने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्धापूर येथून २१ मजूरांना बसची व्यवस्था
अर्धापूर मार्गे छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोंदिया आदी भागाकडे काही मजूर पायी निघाले होते. अर्धापूर येथे ते आले असता वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी स्थानिक प्रशासनाला केली. पोलिस, महसूल, आरोग्य व परिवहन विभाग यांनी समन्वय करून बसची व्यवस्था केली. आरोग्य विभागाने वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र दिले. तसेच परिवहन मंडळाने एसटी बस उपलब्ध केली. या २१ परप्रांतीय मजुरांना जेवणाची व्यवस्था करून एसटीमध्ये बसून निरोप देण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचलेच पाहिजे - अन्‍न योजनेतून मोफत तांदळाचे वितरण सुरु


राज्याच्या सीमेपर्यंत बसची व्यवस्था
लॉकाडाउनमुळे अडकलेल्या आणि प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी नांदेड विभागीय कार्यालय राज्य परिवहन येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२ - २६०६२१ असून यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे. नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.