Video - नांदेडला पश्‍चिम बंगालचे कारागीर अडकले...

नांदेडला पच्शिम बंगालचे कारागीर अडकले.
नांदेडला पच्शिम बंगालचे कारागीर अडकले.
Updated on

नांदेड - जुन्या नांदेडसह इतर भागात गेल्या अनेक वर्षापासून सोने चांदी सराफांच्या दुकानांमध्ये सुवर्ण कारागीर म्हणून काम करत असलेल्या जवळपास हजार ते बाराशे पश्‍चिम बंगालमधील कामगारांनी मंगळवारी आपआपल्या गावी जाण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर नांदेड व परिसरात बांधकाम व इतर कामासाठी आलेल्या इतर राज्यातील कामागारांनी देखील आपआपल्या गावी परत जाण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे जगभरात सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे उद्योग व्यवसायासह बांधकाम व इतर कामेही बंद आहेत. गेल्या दीड महिन्यापासून हाताला काम नसल्याने आता कामगारांना गावी परत जाण्याचे वेध लागले आहेत. जुन्या नांदेड भागात सराफा भाग असून या ठिकाणी पश्‍चिम बंगालचे कारागीर आहेत. त्याचबरोबर इतरही भागातील सुवर्णकारांच्या दुकानात हे कारागीर काम करत आहेत. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जीकडे मागणी
नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पश्चिम बंगालमधील आपल्या गावे जाण्यासाठी आता कारागीर प्रयत्न करीत आहेत. मागील मार्च महिन्यापासूनच देशभरात कोरोनामुळे सराफा व्यापारपेठ ठप्प आहे. त्यामुळे कुठलंही काम नसल्याने उपासमारीची वेळ आली तसेच जिल्ह्यातील तब्बल हजार ते बाराशे सुवर्ण कारागीर हे आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने व्यवस्था करावी, अशी विनंती पश्‍चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर नांदेडला जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही त्यांनी मागणी केली आहे. 

इतर मजूरांचीही मागणी
सुवर्णकामगारांसोबतही इतरही कामासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात मजूर, कामगार आले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील काहीजण बांधकाम आणि इतर व्यवसायाच्या निमित्ताने नांदेडला आले आहेत. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांनी देखील हाताला काम नसल्याने परत गावी जाण्याची मागणी केली आहे. 

नोंदणीसाठी संकेतस्‍थळ उपलब्‍ध
नांदेड जिल्ह‍यात तसेच इतर राज्‍यातील किंवा इतर जिल्‍हयातील नागरीक, विद्यार्थी लॉकडाउनमुळे नांदेड जिल्‍ह्यात अडकलेले आहेत, अशा नागरिकांना आप-आपल्‍या गावी जाण्‍यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी https://covid19.mhpolice.in/ हे  संकेतस्‍थळ उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. या संकेतस्‍थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्‍यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्‍यानंतर आपणास ऑनलाइन टोकन क्रमांक प्राप्‍त होईल. हा ऑनलाईन टोकन क्रमांक त्‍याच संकेतस्‍थळावरून डाऊनलोड पास या ऑपशनवर आपला टोकन क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढून घेता येईल. या पास नोंदणीसाठी आपणास नोंदणीकृत वैद्यकीय व्‍यावसायिक (Registered Medical Practitioner) याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच आपण कंटेनमेंट झोनमधील व्‍यक्‍ती नसावेत, आपण जाणारे ठिकाण हे देखील कंटेनमेंट झोनमधील नसावे. अधिक माहितीसाठी 02462-235077 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच collectornanded1@gmail.com हा ई-मेल नांदेड जिल्‍हा प्रशासनाकडून उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकाव्‍दारे केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.