नांदेड - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागलेल्या एक हजार १३ ग्रामपंचायतींपैकी ९०७ ग्रामपंचायतीसाठी येत्या शुक्रवारी (ता. १५ जानेवारी) मतदान होत आहे. यात सहा हजार ८६२ सदस्य निवडण्यासाठी सहा लाख ३२ हजार ९० स्त्री, सहा लाख ८९ हजार ११८ पुरूष आणि बारा इतर असे एकूण १३ लाख २१ हजार २२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात १६ तालुक्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एक हजार १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार होते. यापैकी जांब (ता. मुखेड) आणि आलेगाव (ता. कंधार) या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रद्द झाली. यामुळे एक हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
९०७ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक
निवडणुक होत असलेल्या ९०७ ग्रामपंचायतीत दोन हजार ८२८ प्रभाग आहेत. या प्रभागातून सहा हजार १६२ सदस्यांना १३ लाख २१ हजार २२० मतदार निवडून देणार आहे. त्यात स्त्री मतदार सहा लाख ३२ हजार ९० तर पुरुष मतदार सहा लाख ८९ हजार ११८ आहे. तर इतर मतदार १२ असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली.
मुखेड, हदगाव तालुक्यात जास्त संख्या
जिल्ह्यात मुखेड आणि हदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी १०८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. तर लोहा ८४, देगलूर ८५, नायगाव ६८, नांदेड ६५, भोकर ६३, बिलोली ६४, कंधार ९७, उमरी ५७, माहूर दहा, धर्माबाद ४०, किनवट २६, हिमायतनगर ५०, मुदखेड ४५, भोकर ६३, अर्धापूर ४३ अशा तालुका ग्रामपंचायत मतदान होत असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली.
१०२ जागा राहणार रिक्त
नामनिर्देशन दाखल करण्याच्या कालावधीत १०२ ठिकाणी वैध अर्ज दाखल झाले नाहीत. यामुळे सोळा तालुक्यातील १०२ सदस्य संख्या रिक्त राहणार आहेत. यात राखीव प्रर्वगाचा उमेदवार उपलब्ध नसणे, जात प्रमाणपत्र नसणे आदी कारणे असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तालुकानिहाय निवडणुकीची माहिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.