वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : माहूर तालुक्यातील आदिवासी उपयोजना अंतर्गत असलेल्या वाई बाजार ग्रामपंचायतीने शासनाच्या निधीतून येथील स्मशानभूमीत वोट्याचे बांधकाम व प्रेत दहनाकरिता बीड धातूची दहनिका उभारुन दोन लक्ष रुपये इतका खर्च केल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी गावाच्या सर्वसमावेशक सर्वांगीण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याची प्रचिती आली आहे.
ग्रामपंचायतीने मागील साडे चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये निष्पक्ष पद्धतीने व्यक्तिनिष्ठ कार्यपद्धतीला हद्दपार करून समाजनिष्ठ कार्य केले आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्यांच्या या कार्य पद्धतीचे कौतुक करत असून विद्यमान लोकप्रतिनिधी जातीचे राजकारण करते असे म्हणणाऱ्या विरोधकाला झणझणीत चपराक बसली आहे. मागील साडेचार वर्षापासून गावामध्ये जातीय सलोखा निर्माण होऊन लोक एकामेकाच्या सुखात दुःखामध्ये सहभागी होऊन गुणा गोविंदाने नांदत आहे. ग्रामपंचायत लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याने गावातील विविध समाज मंदिराजवळ विद्युत रोषणाई आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
ही बाब तत्कालीन राजकारण्यांना खूपत असल्याने गावातील वातावरण बिघडविण्यासाठी नसते उद्योग केले जात आहे. एकेकाळी वाईचे राजकारण एकाधिकारशाही ने बरबटले होते. व्यक्ती समूहात भानगड निर्माण करून त्याचे पर्यावसन पोलीस ठाणे कारवाई पर्यंत केले जायचे त्यामुळे वाई बाजार हे गाव कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु ग्रामपंचायतीवर विराजमान असलेल्या ग्राम विकास पॅनलने लोकांच्या समस्या ओळखून सर्वांगीण विकासाचा विकास आराखडा आखून रस्ते, स्वच्छ पाणी, शौचालय, घरकुल, सिंचन विहीर, शेततळे, गावातील विद्युत रोषणाई आदी कामे प्राधान्यक्रमाने केलीत.
नकारात्मक शक्तीने प्रेरित गढूळ राजकारणापायी वाई बाजारचे नाव अतिसंवेदनशील म्हणून पोलिस खात्याच्या यादीत नोंदविले गेले ते नक्कीच आम्ही कमी करू असा मानस विद्यमान सत्ताधारी यांनी उराशी बाळगून पूर्णत्वास नेले. यापुढेही गावातील विकास कामाचा आलेख आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पॅनल पुढारी फिरोज खान पठाण यांनी केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.