नांदेड : ‘स्वच्छ, सुंदर, नांदेड शहर’ अशी घोषणा करणाऱ्या नांदेड वाघाळा महापालिकेचे सध्या रस्त्यांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील विविध भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून वाहन तर सोडाच पायी चालणेही मुश्किल झाले आहे. नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि त्यातच महापालिकेने विविध विकासकामांसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड शहरातील मुख्य रस्त्यांचे काम अनेक महिने चालले. आता सिमेंटचे चांगले रस्ते झाले खरे पण अजूनही रस्त्याच्या बाजूला असलेला फुटपाथ आणि नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक भागात खोदून ठेवले आहे. तसेच पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजनेसाठी शहरातील अंतर्गत भागातील नगरांमध्ये देखील विकासकामाच्या नावाखाली अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून संथगतीने कामे सुरू आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आणखी अडचणीत भर पडली आहे.
मध्यंतरी शहरातील काही प्रमुख रस्ते महापालिकेकडून वर्ग करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहेत. मात्र, या रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करण्याकडे त्या विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेकडूनही विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून कित्येक महिने झाले तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नियोजन नसल्याने अडथळे...
रस्त्याचे काम करताना नियोजन आणि समन्वय नसल्यामुळे अडथळे वाढत असून त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने रस्ते तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था पूर्ण करणे गरजेचे आहे. पण तसे होताना दिसून येत नाही. चांगले रस्ते तयार झाल्यानंतर आता पुन्हा पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेचे काम करण्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यामुळे अशा प्रकाराकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.