पिक कर्ज हवे...मग करा ऑनलाइन नोंदणी

NND19KJP01.jpg
NND19KJP01.jpg
Updated on

नांदेड : जागतिक महामारी कोवीड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी (लॉकडाउन) घोषीत करण्यात आला आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन २०२० - २१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी ता. १७ मे ते ता. २७ मे या दरम्यान करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

कागदपत्रासह नोंदणी करावी
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ही यादी जिल्हा अग्रणी बँक, नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. सदर यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. 

कर्ज मंजूरीचा अधिकारी बॅंकेला
बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, सातबारा, आठ -अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज दोन फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. त्यानुषंगाने पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

राहूल गांधी यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दिलासा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या केरळ राज्यातील वायनाडू तसेच लगतच्या जिल्ह्यातील काही शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यांना युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून केरळला पाठविले आहे.

विद्यार्थ्यांसह शिक्षक, कामगार अडकले
देशाच्या अनेक राज्यातील कामगार, मजूर, विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटक हे लॉकडाउनमूळे अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. नांदेड जिल्ह्यातही केरळमधील विद्यार्थी, कर्मचारी अडकल्याची माहिती राहुल गांधी यांच्या कार्यालयातून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना कळविण्यात आली होती. यानंतर ही सूचना श्री. तांबे यांनी विठ्ठल पावडे व बुलढाणा येथील मनोज कायंदे यांना केली. 

युवक काँग्रेसच्यावतीने दखल
युवक काँग्रेसच्यावतीने वरिष्ठांच्या सुचनांची दखल घेत २५ तरुणांचे आधार कार्ड, फिटनेस प्रमाणपत्र, वाहनांची कागदपत्रं व सर्व लागणारी माहिती जिल्हा कार्यालयात दिली होती. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडू विनंती अर्ज करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे नांदेड येथून जाण्यासाठी तत्काळ परवानगी मिळाली. 

केरळ सरकारकडूनही ना हरकत
केरळ सरकारकडूनही ना हरकत पत्रासाठी प्रयत्न करण्यात आला. युवक काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याने बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात असलेल्या व अडचणीत असलेल्या केरळच्या तरुणांच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याचं समाधान दिसून आले. परवानगी मिळाल्यानंतर या सर्वांना शुक्रवारी (ता. १५) बाराच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सने केरळकडे पाठविण्यात आले. या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप सोनकांबळे व उपाध्यक्ष रहीम खान हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.