नांदेड - गोदावरी नदीच्या पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी नांदेड तहसीलचे पथक सोमवारी (ता. २६) रात्री कारवाई करत असताना त्यांच्या मदतीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर धावले. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी घटनास्थळी जाऊन वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उभारला.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले होते. गेल्या काही दिवसात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तहसील कार्यालयातंर्गत पथकांची स्थापना करून कारवाईस सुरूवात करण्यात आली होती. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि पोलिसांना सोबत घेऊन वाळू माफियांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पायबंद बसला होता.
नांदेडच्या पथकाची कारवाई
नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदी आणि आसना नदीतून अवैध वाळूचा उपसा होऊ नये, यासाठी नदीपात्राच्या परिसरात उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण आणि तहसीलदार किरण अंबेकर यांनी जमावबंदी कायदा लागू केला तसेच पथक स्थापन करून कारवाईही करण्यात येत आहे. मध्यंतरी गोदावरी नदीकाठी तराफ्याच्या साह्याने अवैध वाळू उपसा होत होता. त्या ठिकाणीही कारवाई करून तराफे जाळण्यात आले होते.
पिंपळगावला केली कारवाई
नांदेड तहसीलचे नायब तहसीलदार मुगाजी काकडे आणि त्यांचे पथक पिंपळगाव येथे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोदावरी नदीवर वाळू माफियांवर कारवाईसाठी गेले. त्या ठिकाणी चार बोटींच्या माध्यमातून अंधारात वाळू उपसा सुरू होता. एकंदरीत परिस्थिती पाहून त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना मोबाईलवर माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण हे देखील घटनास्थळी आले. नांदेड ग्रामिण पोलिसांनाही बोलाविण्यात आले.
हेही वाचलेच पाहिजे - कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत
बोटी दिल्या स्फोटाने दिल्या उडवून
जिल्हाधिकारी डॉ. विपीन साडेअकराच्या सुमारास आले. अंधाराचा फायदा घेऊन वाळू माफिया चारपैकी दोन बोट घेऊन मुदखेडकडे गेले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सहकाऱ्यांसह त्यांचा पाठलाग सुरू केला. मुदखेडचे तहसीलदार झांपले तसेच नायब तहसीलदार नागमवाड यांच्या पथकालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत कार्यवाहीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सहभाग घेतल्याची माहिती श्री. काकडे यांनी दिली. वाळू माफियांच्या बोटी स्फोटाने उडवून दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.