Video:शाळेची घंटा कधी वाजणार !

fail photo
fail photo
Updated on

नांदेड : कोरानाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या आंमलबजावणीसाठी मंदिर, मश्‍जिदी कुलूप बंद आहेत. गर्दी टाळण्यासाठी उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाउनमुळे शाळांना एक महिना अगोदर सुट्ट्या जाहीर केल्या तरी कोरोनाच्या धास्तीने शाळा सुरु करण्याबाबत विद्यार्थी पालकांसह प्रशासनामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा शाळेची घंटा कधी वाजणार ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

राज्यभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनस्तरावरुन खबरदारीच्या उपाय योजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. लॉकडाउनमुळे स्तब्ध जनजिवन सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार धोरनात्मक बदल जारी करण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यसाठी लग्नसमारंभ, अंत्यविधीसाठी लोकांना मर्यादा घालून दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सच्या अंमलबजावणीसाठी धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रमांना निर्बंध जारी केले असले तरी शाळा सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन अद्याप ठोस निर्णय जारी करण्यात आले नाहीत. 


कोरोनाच्या पाश्वभुमीवर मुंबई- पुणे यासह राज्यातील इतर शहरातून ग्रामीण भागाच्या गावखेड्यात अनेक नागरिक दाखल झाले आहेत. खबरदारीच्या उपाय योजना म्हणून परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसाठी गावच्या शाळाच विलगीकरण कक्ष बनल्या. लॉकडाउनमुळे शाळांना एक महिना अगोदर उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यामुळे चाचणीसह वार्षीक परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील कित्तेक शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले.

कोरोनाच्या संकटामुळे शासनस्तरावर प्रचलित नियमानुसार यंदा शाळा जून (ता.१५) सुरू करण्याच्या हालचाली सध्या मंदावल्या असल्यातरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाय योजनांचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. महामारीचे गांभीर्य राखून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे जोखिम ठरणार असल्याने विद्यार्थी पालकांमध्ये शाळेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसर शाळा सुरु करण्याचे पर्याय खुजे पडत असल्याने प्रशासनाही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे. 

दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ देण्यात येत असला तरी यंदा शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ देण्याची हालचाली सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळास्तरावर विद्यार्थी पटसंख्या लक्षात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांच्यसा समन्वयाने सुविधांच्या आधारे शाळा सुरू करण्या बाबत शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला. 

जिल्हास्तरावर  यांच्या आढावा बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी शाळा सुरू करण्या बाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता. उपस्थितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीच्या आपत्ती काळात शाळा सुरू करणे जोखिम ठरणा र आहे.

सोशल डिस्टन्स हाच कोरोनावर पर्याय आहे, विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सचे पालन होणार काय, ग्रामीण भागात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांची मोठी आहे. सद्यस्थितीत महानगरातून गावकडे नागरिकांचे लोंढे सुरू आहेत. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शाळा सुरू करण्यास एकमताने दर्शवण्यात आल्याने यंदा शाळेची घंटी कधी वाजनार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. 

प्रचलित नियमानुसार शासनस्तरावरुन शाळा सुरु करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय प्राप्त नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शाळेने ऑनलाइनचा पर्याय अवलंबवावा. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार सामाजीकस्तरावर पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रशांत दिग्रसकर - शिक्षणाधिकारी, प्राथमिक.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.