आमच्या प्रभागांचा विकास कोण करणार; राखीव प्रवर्गातील मतदारांच्या भावना

पाच हजार मतदार मतदानापासून वंचित
राखीव प्रवर्गातील मतदारांच्या भावना
राखीव प्रवर्गातील मतदारांच्या भावनाesakal
Updated on

अर्धापूर : ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने जशी स्थानिक स्वराज्य नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तशीच अस्वस्थता या प्रवर्गातील मतदारांची झाली आहे. आमच्या प्रभागातील समस्या कोण सोडवणार, विकास कामे कोण करणार, आमच्या अडचणी कोणाला सांगणार, ओबीसी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌शिवाय निवडणूक निर्णय राबविणे म्हणजे राजकीय अस्थिरतेला, आमंत्रण देणे होय, आशा भावना मतदार, स्थानिक स्वराज्य नेते यांनी व्यक्त केल्या आहेत.

ओबीचींच्या राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात ‌‌‌आल्याने ‌‌‌‌‌‌शहरातील एक, सात, नऊ व सोळा या चार प्रभागातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या चार प्रभागातील पाच हजार मतदार आपल्या लोकशाहीतील हक्कापासून वंचित राहणार आहेत. या स्थगिती आदेशामुळे ओबीसींच्या आरक्षणाविषयी‌ उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या वेळी बालाजी माटे, रमेश विरकर, प्रा.डॉ. रघुनाथ शेटे यांनी आपले मत मांडले.

राखीव प्रवर्गातील मतदारांच्या भावना
अकोला : ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट

निवडणूक प्रक्रिया स्थगित

नगरपंचायत सार्वत्रिक झाल्यानंतर नगराध्यक्ष पदांची सोडत काढणार की नाही या बाबतीत कोणाताच निर्णय झाला नाही. राज्यात १०५ नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना स्थगिती देण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत कशी काढणार, स्थगित ठेवलेल्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार, पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात आल्यावर ओबीसींचा नगराध्यक्ष कसा होणार आशा अनेक समस्या निर्माण होणार असल्याने ‌‌‌‌‌‌‌‌ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.