अर्धापूर : नगरपंचायतीत कोण मारणार बाजी?

अर्धापूर, माहूर व नायगावला निवडणूक शांततेत : तीनही तालुक्यातील आज होणार मतमोजणी
election
election
Updated on

अर्धापूर : ओबीसी आरक्षणामुळे(OBC Reservation) रखडलेल्या अर्धापूर, माहूर व नायगाव नगरपंचायत निवडणुकीतील(Nagar panchayat Election) विविध प्रभागासाठी मतदान केंद्रावर मंगळवारी (ता.१८) रोजी पार पडलेल्या निवडणुकीत सकाळ पासून दुपारपर्यंत मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला तर मध्यान्ह नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदारांचे रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. माहूरच्या चार प्रभागात एकूण २६७६ मतदारांपैकी २०९२ इतक्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी ७८.१८ एवढी आहे. तसेच अर्धापुरात चार हजार ७८६ मतदारांपैकी तीन हजार ९०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नायगावला २३७० पैकी १८५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या वेळी सरासरी ७८.४४ मतदान झाले आहे.

election
नांदेड : सात वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नगरपंचायतीच्या चार जागांसाठी विक्रमी मतदान झाले असून चार हजार ७८६ मतदारांपैकी तीन हजार ९०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची मतमोजणी बुधवारी (ता.१९) सकाळी तहसील कार्यालयात होणार असून पुढील पाच वर्षांचे कारभारी ठरणार आहे. नगरपंचयतीच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. १७ प्रभागातील निवडणूक चूरशीची व अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार‌ याकडे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. मतदारांनी चार प्रभागातील आठ मतदान केंद्रावर सकाळ पासूनच गर्दी केली होती. मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये एक हजार २३४, सात मध्ये ८६१, नऊमध्ये ९०८, तर सोळा मध्ये ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या चार प्रभागातील चार हजार ७८६ मतदरांपैकी तीन हजार ९०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नगरपंचायतीच्या दोन टप्प्यांत झालेल्या १७ प्रभागांची मतमोजणी बुधवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.

election
नांदेड : पुढील आठवड्यापासून 'एसटी' प्रवास सुरळीत होणार

ही मतमोजणी नऊ टेबलावर होणार असून मतमोजणीच्या चार फेऱ्या होतील, पहिल्या टप्प्यात एक ते नऊ प्रभागांची मतमोजणी होईल या टप्प्यात एक व दोन फेऱ्या होतील. तर दुसऱ्या टप्प्यात दहा ते सतरा प्रभागांची मतमोजणी होईल. या टप्प्यात तीन व चार फेऱ्या होतील. नगरपंचतीच्या प्रभागातील अंतिम निकाल १२ पर्यंत लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरातील दुकाने, हॉटेल बंद राहतील, जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आल्याने तहसील कार्यालयाच्या परिसरात पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये तसेच मिरवणूक काढता येणार नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली राजकीय दृष्ट्या विविध राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेची असणारी माहूर नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित चार प्रभागाची निवडणूक मंगळवारी (ता.१८) रोजी शांततेत पार पडली असून सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्प प्रतिसाद दिला तर दुपारनंतर बहुसंख्येने मतदान झाले. एकूण या निवडणुकीचा निकाल (ता.१९) रोजी जाहीर होणार आहे.(Nanded News)

election
नांदेड : पुढील आठवड्यापासून 'एसटी' प्रवास सुरळीत होणार

एकूण १७ प्रभाग असलेल्या माहूर नगर पंचायत निवडणुकीसाठी २१ डिसेबंर २०२१ रोजी १३ प्रभागाकरिता पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. तर ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागातील उर्वरित ४ प्रभागाची निवडणूक खुल्या प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता (ता.१८) जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यातील १३ प्रभाग व १८ जाने रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील ०४ प्रभाग मिळून एकत्रित १७ प्रभागाची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे (ता.१९) जानेवारीला होणार आहे. एकंदरीत १७ प्रभागात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या सभागृहात चार टेबलवर होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. शहरातील १७ प्रभागापैकी लक्ष लागून असलेल्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका वानिता जोगदंड, प्रभाग २ हा नगरध्यक्षा शीतल मेघराज जाधव व नगरसेविका आशा निरधारी जाधव, प्रभाग क्रमांक ७ माजी नगरध्यक्ष राजेंद्र केशवे, माजी उप नगरध्यक्ष राजकुमार भोपी व गटनेता दीपक कांबळे, प्रभाग क्रमांक ११ दोन नगरसेवक, प्रभाग क्रमांक १३ तिन नगरसेवक तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये माजी नगरध्यक्ष फिरोज दोसानी व गटनेते रहमत अली यांची प्रतिष्ठापनाला लागली असून या प्रभागातील मतदार कोणत्या शिलेदाराची निवड करतील हे मतमोजणी नंतर कळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()