नांदेड : अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये उपचार न घेता मुंबई का गाठली, यावर खूप आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पुढेही होत राहतील. पण काही गोष्टी लक्षात घ्या.
नांदेडमध्ये कित्येक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. सरकारी दवाखाने आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आहे. याखेरीज कोरोनाच्या आपत्ती नियोजनाचीही व्यवस्था आहे. यातल्या कुठेही अशोक चव्हाण यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतात.
हेही वाचा - अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...
अशोक चव्हाण हे नांदेडमधले सर्वात जास्त महत्व आणि लोकप्रियता असलेले नेते आहेत. राज्याचे मंत्री आहेत. ठरवलं तर मुंबईतही मिळणार नाहीत, असे महागडे उपचार जगातून कुठूनही तज्ज्ञ डॉक्टर आणून आपल्या राहत्या घरीही ते करून घेऊ शकतात.
मुद्दा असा आहे, की कोरोनाच्या आपत्तीकाळात त्यांनी मदतकार्य आणि इतर कामांसाठी अनेकदा शहरात आणि जिल्ह्यात दौरे केले. घरीही लोकांची मदतीसाठी सतत रांग लागून राहिली. त्यामुळे त्यांनाच बाधा झाल्याचे कळल्यानंतर लोकांची गर्दी वाढू लागली होती. नेत्यांचे चाहते ही एक महाकठीण गोष्ट असते. त्यांना आवरण्यासाठी वेगळी पोलीस यंत्रणा लावणे आणि गर्दीमुळे या लोकांचा जीव धोक्यात आणणे परवडणारे नाही.
हे देखील वाचलेच पाहिजे - चायना टू मुखेड, व्हाया मुंबई - पुणे
कोणत्याही सूज्ञ नेत्याने यावेळी जे करायचे असते, तेच अशोक चव्हाण यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तशाच सूचना केल्या आणि चव्हाण तात्काळ मुंबईला गेले. त्यांच्या रुग्णवाहिकेत बसतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला, तर चाहतेच काय तर भेटायला स्थानिक नेत्यांनी आणि शूटिंग घ्यायला पत्रकारांनी केलेली गर्दी दिसते. हे लोक जर गर्दी करत असतील, तर सामान्य लोकांचं काय?
येथे क्लिक कराच - निर्वाणरुद्र पशुपतींचा खून का केला, वाचा आरोपीच्या तोंडून
कोणताही नेता लोकांत दीर्घकाळ राहायचा असेल, तर त्याने सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करून चालत नाही. सरकारी दवाखान्यात त्याने उपचार घेणे अगदी आदर्शवत वाटत असले, तरी अशाप्रसंगी तोही दांभिकपणाच ठरेल. त्यापेक्षा लोकांपासून, कार्यकर्त्यांपासून काही काळ दूर राहून पुन्हा ठणठणीत होणे जास्त महत्वाचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.