Nanded News : चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार गप्प का? खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा भाग गिळला आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

नांदेड - चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा भाग गिळला आहे. यासंबंधी खासदार राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले असले तरी देशामध्ये आम्ही महिन्यापासून हा विषय मांडत आहोत. लडाखचा अर्धा भाग गेला आहे. मणिपूर हातातून गेले आहे.

परंतु, पंतप्रधान, संरक्षण मंत्री राजकारणात अडकून पडले आहेत. लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीवर आमचे ५६ इंच छातीवाले सरकार गप्प बसले आहे, असा आरोप करत देशाला संरक्षणमंत्री आहे का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.