नांदेड : संगीत या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. अगदी कितीही आजारी माणूस असला तरी, संगीत ऐकले की त्याला काहीअंशी प्रमाणात बरे वाटू लागते. त्यामुळेच संगीत हा शब्द उचारला तरी मनाला उल्हासित होते.
संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे. इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात. मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच संगीताचा विकास होत गेला. संगीताचा मूळ आधार ‘वाद्य’ हेच आहे. त्यामुळे त्याची जोपासना आजच्या युवा पिढीकडून झालीच पाहिजे.
हेही वाचा - भक्तांच्या हाकेला धावनारा सत्यगणपती
नांदेडमधील आॅक्सफर्ड ग्लोबल इंग्रजी शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत अससलेले सिद्धांत बिडवई गेल्या दहा वर्षांपासून विविध वाद्य वाजविण्याची परंपरा जोपासत आहे. नांदेडच्या सहयोग कॉलेजमधून त्यांनी एमबीएची पदवी घेतली. गेल्या दहा वर्षांपासून ते गिटार वाजविण्याचा छंद जोपासत आहेत. सोबतच ड्रम्स, माऊथ आॅर्गनही वाजवतात. सुरुवातीला सिद्धांत यांनी जाहीर शो केले. त्याला चांगाला प्रतिसाद मिळत गेला. मात्र, सुरुवातीला असंख्य अडचणी आल्या. परंतु, त्यावर मात केली. अलिकडे वाद्य विजविण्याकडे आजच्या तरुणाईंना आकर्षित करण्यासाठी क्लासेस सुरु केले. जवळपास सिद्धांत यांनी तीन ते चार हजार युवकांना गायनासोबतच विविध वाद्य वाजविण्याचेही प्रशिक्षण दिले आहे.
हे देखील वाचाच - नांदेड जिह्यात फवारणीचा काळ अन जनजागृतीचा दुष्काळ
क्लासेसच्या माध्यमातून नवकलाकार घडताहेत
कॉलेजला शिकत असताना मायरी साॅग सिद्धांतने ऐकले. जे की आईवर आहे. त्यामुळे सिद्धांत यांनाही गिटार वाजविण्याची इच्छा झाली. तीच जिद्द मनाशी घट्ट बांधून त्यांनी सराव सुरु केला. नांदेड शहरातीलच राहुल जमदाडे आणि संदीप पुंडगे यांच्याकडून गिटार वाजविण्याचे धडे सिद्धांत यांनी गिरवले. शिवाय पुणे तसेच हैद्राबादलाही प्रशिक्षण घेतले. आज ते एका इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगीत विषय शिकविण्यासोबतच क्लासेसच्या माध्यमातून नवकलाकार घडवत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा ‘ग्रीन बॅंड’ नावाचा सहा जणांचा ग्रुप देखील आहे.
येथे क्लिक कराच - कोरोना इफेक्ट : साथरोग तपासणीत घट केवळ २१ हजार रुग्णांची तपासणी
‘जे बोलते ते वाद्य’
सिद्धांत सांगतात की, जसजसे मानवी कौशल्य प्रगत झाले, तसतसी वाद्यांच्या निर्मितीत व प्रकारांत वाढ झाली. संगीत पध्दतीतील भेदांमुळे, प्रगतीमुळे व साधनसामग्रीच्या वैविध्यामुळे देशोदेशींची वाद्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भारत व इतर पौर्वात्य देशांतील एकधून पध्दतीमुळे वाद्य हे केवळ मानवी गायनाबरोबर साथीचे म्हणून किंवा मानवी आवाजसदृश आवाज काढण्याचे साधन म्हणूनच राहिले. लयवाद्ये मात्र वेगळी होती. त्यांचाही दर्जा नृत्याच्या साथीचे दुय्यम वाद्य हाच असे. ‘जे बोलते ते वाद्य’ अशीच वाद्याची भारतीय संकल्पना आहे.
संगीताची जोपासना व्हावी
संगीत हे देवासारखे आहे. त्याची जोपासना केली की, आपल्या पूर्ण इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात, याचा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी संगीताची जोपासना करावी, एवढेच सांगावेसे वाटते. - सिद्धांत बिडवई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.