- गौरव वाळिंबे
Nanded News : मागील तीन दिवसांपूर्वी पुणे शहरात विनाक्रमांक महागड्या मोटारीने दोघांना उडवल्याची घटना घडली. यात मोटारचालक अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पुणे शहरात एवढी मोठी दुर्घटना घडली असताना नांदेड शहरात अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने वाहने पळवीत आहेत.
नांदेड वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत एकाही अल्पवयीनवर प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. किमान आता तरी, पुणे येथील दुर्घटनेचा धडा घेऊन शहर वाहतूक शाखेने कडक पावले उचलावीत तरच अशा घटनांना चाप बसेल, असे तज्ज्ञांमधून सांगण्यात येत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारा वाहतूक पोलिस विभाग या चालकांना अभय देत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. अल्पवयीन वाहनचालकांकडून अपघाताचे प्रकार अनेकदा घडले आहेत, त्यांच्यामुळे इतर नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. परंतु वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात कोणतेही सकारात्मक पावले उचलली नसल्यामुळे अद्यापही या प्रकारात काही फरक पडला नसल्याचे दिसत आहे.
शहरातील भाग्यनगर, श्रीनगर, बाबानगर आदी परिसरात शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिसरात स्पोर्टसबाईक भरधाव वेगात चालविण्याचे प्रकार पहावयास मिळतात. हे प्रकार अनेकदा मुलांच्या जिवावरसुद्धा बेतले आहेत.
अठरा वर्षांच्या आतील व्यक्ती वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास त्याच्यासह त्याला वाहन देणाऱ्या व्यक्तीला मोटार वाहतूक कायदा कलम १८० आणि नियम ५ नुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच गंभीर अपघात होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी झाल्यास अल्पवयीन वाहनचालकासह त्याच्या ताब्यात वाहन देणाऱ्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३०४ (अ) (बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने मृत्यूस जबाबदार) तसेच मोटार वाहन कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल होऊन त्यास कमीत कमी सात वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.
शहरातील वाहतूक शाखेत चौकशी केली असता अल्पवयीन वाहनधारकांवर एकही कारवाई झाले नसल्याचे समजते. इतर प्रकरणात एक एप्रिल ते २१ मे या दोन महिन्यांच्या काळात एकूण ५५०१ केसेस नोंद झाल्या असून ६४ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२ महिन्यांच्या काळात एकूण ५५०१ केसेस नोंद
६४ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल
सध्याला महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे अल्पवयीन वाहनचालकांवर होणाऱ्या कारवाईचे प्रमाण कमी आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाईची मोहीम करणार आहे. वाहनचालकांनी सर्व नियमांचे पालन करून आपली वाहने चालवावी. — साहेबराव गुट्टे,
- पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, नांदेड.
नांदेडमध्ये अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जावी, तरच याला चाप बसले. तसेच पालकांमध्ये यासंदर्भात जनजागृती नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांकडेसुद्धा दुचाकी पहावयास मिळते. या प्रकरणात पोलिस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय आहे असे मला वाटते.
— नंदकुमार दुधेवार, अध्यक्ष, शहर विकास व वाहतूक सुरक्षा समिती, नांदेड.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.