नांदेड : चूल आणि मूल या सारख्या रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले(savitribai phule) यांनी मुक्त केले आहे. म्हणूनच आज पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत. महिलांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा विसर पडू न देता त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्यासासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर (nanded zp president mangarani ambulgekar)यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोमवारी (ता. तीन) साजरी केली. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘संवाद सावित्रीच्या लेकींशी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर जयश्री पावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशिला बेटमोगरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रा. दीपा बियाणी, संतोष देवराये व्यासपीठावर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बिलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या भरारी विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध शाळेतील विद्यार्थिनींनी ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षण विस्तार अधिकारी सुचीता खल्लाळ व आनंदी विकास यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू अमदूरकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. टी. जी. चिमनशेट्टे, डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.
आत्मविश्वास हा दागिना आत्मविश्वास हा दागिना असून आत्मविश्वासाने जगणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर त्याची झळाळी दिसते, म्हणून महिलांनी देखील आत्मविश्वासाने कामे हाती घेवून नवीन कौशल्य स्वीकारावे. जिल्ह्यातील महिला अधिकारी, कर्मचारी आत्मविश्वासू असून त्या कामात सक्षम आहेत. घर आणि नोकरी त्या समर्थपणे सांभाळत आहेत. कोरोना सारख्या परिस्थितीमध्येही महिलांनी पुढे येऊन कामे केलेली आहेत. यापुढे देखील नव्या दमाने व आत्मविश्वासाने महिलांनी आपल्या कामातून ठसा उमटवावा, असा मंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.