चुकीच्या पद्धतीचे सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग थांबवावे; स्वाभिमानाचे कृषी मंत्र्यांना निवेदन

सध्या सोयाबीनच्या पिकाचे कापणी प्रयोग चुकीच्या पध्दतीने काढून अधीकची उत्पादकता दाखविण्यात येतं असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे यात बदल करणे गरजेचे आहे.
स्वाभिमानीचे दादा भुसेंना निवेदन
स्वाभिमानीचे दादा भुसेंना निवेदन
Updated on

नांदेड : चुकीच्या पद्धतीने सोयाबीन पीक कापणी प्रयोग थांबवून सुधारित पद्धतीने पीक कापणी प्रयोग करण्यात यावे. यासोबतच पीक आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, नांदेड जिल्हाध्यक्ष हणुमंत राजेगोरे यांनी मंगळवारी (ता. २९) कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

सध्या सोयाबीनच्या पिकाचे कापणी प्रयोग चुकीच्या पध्दतीने काढून अधीकची उत्पादकता दाखविण्यात येतं असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे यात बदल करणे गरजेचे आहे. सोयाबीन पीक कापणी प्रयोगामध्ये निश्चित केलेल्या क्षेत्रातील पीक कापून ठेवणे आणि पुढील २ ते ३ दिवसात संपूर्ण वाळल्यानंतर त्याचे वजन करणे आणि उत्पादकता काढणे अपेक्षित असतांना एकाच दिवसात २ तासाच्या आताच संपूर्ण पीक कापणी प्रयोग उरकण्यात येतो. पीक कापणी नंतर कापलेल्या पिकाचे वजन करण्यात येते.

हेही वाचा - सीबीएसई सीटीईटी अधिसुचना; सिलॅबस आणि पॅटर्न लवकरच होणार लागू

त्यानंतर सोयाबीन बडवून त्याचे बियाणे काढून त्याचे वजन करण्यात येते. आलेल्या वजनानुसार सोयाबिनची उत्पादकता निश्चित करण्यात येते. या प्रक्रिये दरम्यान कृषि विभाग कर्मचारी किंवा पीक विमा कंपनी प्रतिनिधी यापैकी कुणाकडेही माश्‍चर मीटर नसते तरीपण ते पीक कापणी प्रयोग मोबाइल अप्पमध्ये शून्य माश्‍चर नोंदवतात, असे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी प्रत्यक्षात पाश्‍चर मीटर आणून मोजले असता १५ ते ३० चे माश्‍चर निघते. त्यामुळे प्रत्यक्ष माश्‍चर पीक कापणी प्रयोगात ग्रहित धरण्यात येत नाही. तसेच काडी कचरा व डागी सोयाबीनही साफ करण्यात येत नाही. त्यामुळे काढण्यात आलेली सोयाबीनची उत्पादकता पूर्णपणे चुकीची येत आहे.

अतिवृष्टीमध्ये १५ ते ३० च्या दरम्यान माश्‍चर असतांना, मोबाइल अॅपमध्ये शून्य माश्चर टाकणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे. यामुळें यंदा चूकीच्या पद्धतीने होणारे सोयाबीन पीक कापणी प्रयोग थांबवून सर्व कर्मचार्‍यांना तातडीने माश्‍चर मीटर देवून मोबाइल अॅपमध्ये प्रत्यक्ष शेतावर असणारे माश्‍चर नोंदविण्यात यावे व त्यानंतर प्रत्यक्ष येणारे आकडेवारीवर उत्पादकता काढण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यात १, १५१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी पूर्व संमती

गावनिहाय पीक उत्पादकता पध्दत आवश्यक सध्याच्या उत्पादकता काढण्याच्या पद्धतीत महसूल मंडळ निहाय पीक कापणी प्रयोग करण्यांत येतात. परंतु मागील काही वर्षात अवकाळी आणि मान्सून पाऊस यांचा पॅटर्न बदलला असून, एकाच महसूल मंडळात एका गावात अतिवृष्टी तर एका गावात कोरडे अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे.

अशा परिस्थितीत पीक कापणी प्रयोगाची जुनी पध्दत बदलुन नवीन तंत्रज्ञानावावर आधारीत गावनिहाय पीक उत्पादकता काढण्याची नवीन पध्दत आणणे आवश्यक आहे. याबाबत कृषी मंत्र्यांनी अभ्यास पूर्वक विचार करून संबंधित यंत्रणेला निर्देश ध्यावेत अशी मागणी राजू शेट्टी, हणमंत राजेगोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.