बारडच्या युवा शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

सेंद्रिय पद्धतीने वाढवल्याने मागणी वाढली : कमी शेतीत मिळतो मोठा नफा
Strawberry
Strawberrysakjakl
Updated on

नांदेड : तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो हे, बारड येथील एका युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून स्ट्रॉबेरीची शेती चांगला पर्याय असून, सहजपणे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून मोठा नफा कमवता येऊ शकतो.

Strawberry
आमदार बंटी भांगडीया यांच्या नातेवाइकांच्या गाडीवर हल्ला

स्ट्रॉबेरीची शेती साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात केली जाते. हे पिक थंड वातावरणात घेतलं जातं. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये थंडीची सुरुवात झाली की स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. जानेवारी, फेब्रुवारीत हे स्ट्रॉबेरीचं पिक काढायला येतं. बारड (ता.मुदखेड) येथील बालाजी मारोतीअप्पा उपवार यांनी पारंपरिक पीकांसोबतच स्र्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वर येथे जाऊन स्ट्रॉबेरीची शेती बघितली. तेथूनच प्रेरणा मिळाल्याचे बालाजीने सांगितले. घरी आई कुसुमबाई, वडील मारोतीअप्पा आणि बारावी उत्तीर्ण असलेला भाऊ ओमप्रकाश बालाजीला शेती करण्यासाठी मदत देत असतात. बालाजीला साडेसात एक्कर शेती आहे. दहा गुंठ्यावर बालाजीने स्र्टॉबेरीची बाग लावली. महाबळेश्वरला जाऊन १२ रुपये प्रमाणे ‘एस. ए.’ जातीची सहा हजार रोपे आणलीत. ता.२५ आॅक्टोबर २०२१ रोजी त्यांनी रोपे लावली असून, पहिली तोड ता.१० डिसेंबर २०२१ रोजी केली. सेंद्रीय पद्धतीने ही बाग वाढवल्याने स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे.

बालाजी शेतीमध्ये हळद, केळी, हरभरा आणि गहू ही पारंपारिक पीक घेत आहे. बालाजी यांनी वारंगा (जि.हिंगोली) येथील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रातून तीन वर्षाचा अॅग्री डिप्लोपा केलेला आहे. नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती फुलविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांचा हा निर्णय युवा शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी असा आहे.

Strawberry
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू...
  • स्ट्रॉबेरीची शेती कशी करावी?

  • सप्टेंबरपासूनच तयारीला लागावं लागतं.

  • तीन वेळा शेतीची चांगली मशागत करावी लागते.

  • पीक लावण्याच्या ठिकाणी खत टाकावं लागतं

  • वाफ्यांमधील सरीची रुंदी साधारण दोन फूट आणि दोन सऱ्यांमधील अंतर हे दीड फूट असावं.

  • माती परीक्षणही करावं लागतं.

  • फळ चांगले यावे म्हणून तापमान ठेवण्यासाठी मिनीस्प्रिंकलर लावावे.

  • जोड व्यवसाय म्हणून स्ट्रॉबेरीची निवड

अलिकडे हवामानातील बदलामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने बालाजीने स्ट्रॉबेरीची बाग विकसीत करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाहीतर त्यांनी हा व्यवसाय विकसितही केला आहे. स्ट्राॅबीरीवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावरान गाईचे दूध, ताक, गावरान अंडी, दशपर्णी अर्क, वेस्ट डी कंपोजर, जीवामृत आदींची फवारणी ते करत आहेत.

Strawberry
Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

"सध्याची परिस्थिती बघता जर शेती आधुनिक पद्धतीचा वापर करून विकसित तंत्रज्ञानाच्या जोरावर केली तर निश्चितच नैराश्य टाळता येऊ शकते. काहीतरी वेगळे करावे हा संकल्प करून मी नेहमीच शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असून, चांगले उत्पादन मिळत आहे."

- बालाजी मारोतीअप्पा उपवार (युवा शेतकरी, बारड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.