नांदेड जिल्ह्यात तरुण गेला पुरात वाहून, शोध कार्य सुरु

कुरुळा (जि.नांदेड) : कुरुळा (ता. कंधार) मंडळात पुन्हा एकदा पावसाने   हाहाकार माजवला असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.
कुरुळा (जि.नांदेड) : कुरुळा (ता. कंधार) मंडळात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.
Updated on

कुरुळा (जि.नांदेड) : कुरुळा (ता. कंधार) (Kandhar) मंडळात पुन्हा एकदा पावसाने (Rain) हाहाकार माजवला असून नदी व नाल्यांना पूर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त पाण्यामुळे नदी नाले व ओहोळ यांनी विक्राळ रूप धारण केले आहे. ठिक-ठिकाणी खोलगट भागात व रस्त्यावरील ओहोळाच्या ठिकाणी वाहतूक (Nanded) ठप्प झाली असून हनमंतवाडी येथील तरुण शेतकरी नदीला पूर आल्याने पाण्यात वाहून गेला आहे. कुरुळा मंडळात शुक्रवारी (ता.२४) रात्री व शनिवारी (ता.२५) पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे कुरुळा येथून जवळच असलेल्या हनमंतवाडी येथील पाणवंत नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान बबन दत्ता लिंबकर (वय २३) हा तरुण हनमंतवाडी गावातून नदीच्या पलीकडे आपल्या २० ते २२ गुराढोरासह निघाला.

कुरुळा (जि.नांदेड) : कुरुळा (ता. कंधार) मंडळात पुन्हा एकदा पावसाने   हाहाकार माजवला असून नदी व नाल्यांना पूर आला आहे.
नांदेडच्या 'संजीवनी'ची काठमांडूतील बाँक्सिंग स्पर्धेसाठी निवड

बैल, गायी व इतर गुरे नदीपात्रातून पुढे जात असताना दृष्टीदोष असणाऱ्या बबन लिंबकर या तरुणाने बैलाची शेपटी धरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे सरकत असतानाच पाण्याचा प्रवाहच एवढा होता की, शेपटी हातातून निसटली आणि बबन प्रवाहाबरोबर वाहू लागला. साधारणतः १०० मीटरपर्यंत बबन दिसला. त्यानंतर मात्र बबन पाण्यात बुडाला आणि मग दिसलाच नाही असे हनमंवाडी येथील पोलीस पाटील हणमंत पवार यांनी सांगितले. गावकऱ्यांना ही बातमी समजताच शोधकार्य चालू केले. परंतु अद्यापपर्यंत बबनचा थांगपत्ता लागला नाही. सदरील घटना कंधार तहसील कार्यालयास काळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.