योजना केवळ नावाला, वृक्ष गेले गावाला...!

निसर्ग समृद्धी केवळ कागदावरच; सामाजिक वनीकरणाचा सावळा गोंधळ
plan is only in name tree has gone to village richness of nature is only on paper
plan is only in name tree has gone to village richness of nature is only on paper
Updated on

कुरुळा : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च करून निसर्ग समृद्धीसाठी मात्र केवळ कागदावरच प्रयत्न होतात आणि त्यातून केवळ कागदावर हिरवळीचा लाभ होऊन जातो. ज्यामुळे रस्ते मात्र कायम ओसाड आणि हिरवळीला आसुसलेली असतात. केवळ अंमलबजावणीचा मुखवटा धारण करून निधीचा चुराडा होतो, यातून दर्शन होते ते सामाजिक वनीकरण विभागाच्या सावळ्या गोंधळाचे आणि योजना केवळ नावाला वृक्ष गेले का गावाला? असा अनुत्तरित प्रश्न उपस्थित होतो.

plan is only in name tree has gone to village richness of nature is only on paper
Nashik Municipal Corporation|सत्तेची पोलादी भिंत चिरणारा ठरेल जायंट किलर

सामाजिक वनीकरण उपविभाग लोहा अंतर्गत कुरुळा आणि पेठवडज परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आलेल्या या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. नियमबाह्य आणि मर्जीतील लोकांना या योजना दिल्या जात असून योजना परस्पर लाटल्याची चर्चा सुरू झाली आहे. कुरुळा परिसरातील कुरुळा ते हिपरगा तीन किलोमीटर, दिग्रस ते भेंडेवाडी चार किलोमीटर, दिग्रस ते घागरदरा तीन किलोमीटर, दिग्रस ते मुंडेवाडी छोटे दिग्रस ते गांधीनगर तीन किलोमीटर, दिग्रस (बुद्रुक) ते गुंटूर दोन किलोमीटर यासह कंधार तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा साधारणतः ५२ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केल्याची माहिती मिळाली आहे.

plan is only in name tree has gone to village richness of nature is only on paper
Nashik Municipal Corporation|सत्तेची पोलादी भिंत चिरणारा ठरेल जायंट किलर

वृक्ष लागवडीनंतर वृक्ष देखभाल संगोपन करण्याची जबाबदारी संबंधितावर असते परंतु त्याबद्दल सामाजिक वनीकरण मात्र चकार शब्दही काढत नाहीत. अनेक ठिकाणी लागवडीसाठी मजुराऐवजी यंत्राचा वापर केला जातो. दर तीन महिन्यांनी वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची व्यवस्था करणे, एक किलोमीटर अंतरावरील वृक्षासाठी एक डीएपी आणि एक पोते युरिया खताची मात्रा आवश्यक असते मात्र असे कुठेही होताना दिसत नाही. पर्यावरणीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या अशा योजना केवळ कागदोपत्रीच का राहतात? हे वृक्षप्रेमींना न उलगडणार कोडे आहे. योजना कार्यरत असूनही सर्व रस्ते बोडके आणि उजाड दिसत असून याकडे सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजना केवळ नावाला आणि वृक्ष गेले का गावाला? असा प्रश्न वृक्षप्रेमींकडून उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.